आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत हजार घरांत आले इको-फ्रेंडली बाप्पा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- लाडक्या गणरायाचे सोमवारी ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. गेल्या 20 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानेही बाप्पांसोबत आगमन करून सर्वांना दिलासा दिला. जवळपास 25 हजार घरांमध्ये शाडू मातीपासून साकारलेल्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली.

हार, फुले, दूर्वा आणि आवडत्या मोदकांचा नैवेद्य बाप्पाला दाखवण्यात आला. शहराचे ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपती मंदिर परिसरात पहाटेपासून उत्सवाचे वातावरण होते. सायंकाळी चौकाचौकांत मंडळांनी पावली आणि लेझीम पथकासह गणरायाचे स्वागत केले. महिला आणि तरुणीदेखील यात मागे नव्हत्या. या वर्षी अनेक मंडळांनी मुलींसाठी वेगळ्या पावली पथकाची निर्मिती केली होती. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पावसाची हजेरी लागल्यामुळे ‘पुढील दहा दिवसांत आणखी चांगल्या सरी कोसळू दे’ अशी प्रार्थना भाविकांनी विघ्नहर्त्याला केली. पीओपीच्या तुलनेत शाडू मातीच्या मूर्तींचे दर अधिक होते तरीदेखील पर्यावरणाचे भान ठेवून अनेक भाविकांनी शाडू मातीच्या मूर्तींची खरेदी केली.