आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओम साईराम मंडळाचा ‘इको फ्रेंडली’ गणेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पर्यावरण रक्षण व्हावे, यासाठी ओम साईराम महिला मंडळाच्या माताभगिनी सरसावल्या आहेत. इको फ्रेंडली गणेश उपलब्ध व्हावेत म्हणून मातीपासून मूर्ती साकारण्यात स्वत:ला त्यांनी गुंतवून घेतले आहे.
लोणचे, पापड, मसाले अशा पारंपरिक कामांत गुंतले जाणारे हात आता मूर्ती कलेकडे वळले आहेत. दिवसेंदिवस वृक्षांची कत्तल आणि सिमेंटचे जंगल उभारले जात आहे. यामुळे प्रदूषणात भर पडत आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी त्या योगदान देत आहेत.
मूर्ती शास्त्रानुसार एक वितापेक्षा लहान अशा आकाराच्या आहेत. रंगकामही पर्यावरणपूरक आहे. हळकुंडांपासून तयार केलेले पिंजर कुंकू व शेंदरी रंग वापरला जाणार आहे.
या आहेत महिला : रेखा जाधव, गुणाबाई कासार, निर्मला सोलापूरकर, श्वेता कस्तुरे, प्रतिभा बहुलीकर, माधुरी विभूते, अनुपमा कुलकर्णी, ललिता भद्रशेट्टी, यशोदा आसापुरे, प्रमलिा अपशिंगे, सुवर्णा कुरुलकर.
महिला मंडळात ११ महिला आहेत. यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा यासाठी हा खटाटोप आहे. वेळेचा योग्य सदुपयोग व ईशसेवा हा उद्देश आहे.''
रेखा जाधव, अध्यक्ष, महिला मंडळ