आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज 7,579 घरांत बसणार इको गणपती, DB स्टारचे ‘मी बनवणार माझा बाप्पा’ अभियान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींचा पर्यावरण आणि पर्यायाने जीवसृष्टी मानवावरही घातक परिणाम होतो. ही बाब ध्यानात घेऊनच ‘दिव्य मराठी’च्या वतीने शाडू माती, लाल मातीचे गणपती साकारण्याचे अभियान हाती घेतले जाते. संदेशच देता यासाठी प्रशिक्षण कार्यशाळा घेऊन गणेशभक्तांना पर्याय उपलब्ध करून देण्यावर भर दिला जातो. मी बनवणार माझा बाप्पा या अभियानाला यंदा उदंड प्रतिसाद मिळाला. तब्बल ७,५७९ जागरूक गणेशभक्तांनी शाडू मातीचे गणपती बनवण्याचे प्रशिक्षण घेतले.

गतवर्षीच्या तुलनेत कार्यशाळा आणि मूर्ती बनवण्याची संख्या दुपटीने वाढली आहे. गतवर्षी प्रशिक्षणार्थींचा प्रतिसाद जास्त होता. या वेळी वेळ कमी पडला. त्यामुळे या वर्षी १५ ऑगस्टपासूनच कार्यशाळा सुरू करण्यात आल्या. शिवाय २५ कलावंतांनी प्रशिक्षण दिले. १९ दिवस चाललेल्या या अभियानात ७२ ठिकाणी लोकांनी उत्साहाने स्वतः बाप्पा साकारला. या वेळी सर्वांना पीओपीचे धोके सांगण्यात आले. लहान मुलांच्या सहभागामुळे पालकांचा वेगळा उत्साह पाहायला मिळाला. विविध सोसायट्या, शाळा, महाविद्यालये, मंदिरे इत्यादी ठिकाणी आयोजित प्रशिक्षणामध्ये बनवलेले पर्यावरणपूरक गणपतीच घरी बसवण्याचा संकल्प अनेकांनी केला.

या अभियानांतर्गत तज्ज्ञ कलावंतांनी मूर्ती कलेचे प्रशिक्षण दिले. त्यामध्ये गोकुळ पैठणकर, व्ही. एस. पैठणकर, नागेश कानडे, योगेश सोनवणे, गजानन जाधव, नागेश खिरोडकर, सरिता भगत, सौरभ म्हस्के, सौरभ सोनवणे, दीपशिखा फाउंडेशनच्या संचालिका मनीषा चौधरी, शुभदा देशमुख, मृण्मयी कुलकर्णी, प्रा. रवींद्र तोरवणे, डॉ. दीपक गायकवाड, डॉ. सचिन मोरे, डॉ. युवराज गहेराव, प्रा. पवन काळे, प्रा. राज पोपळघट, अनुराधा पुराणिक, जयंत यावलकर, प्रभु इंगळे, प्रकाश कुलकर्णी, राहुल कांबळे, दीपक शेलार, अमोल बेले यांचा समावेश आहे.

सोप्या पद्धतीने प्रशिक्षण
- सोप्या पद्धतीने दिलेल्या प्रशिक्षणातून हजारो विद्यार्थ्यांनी इको फ्रेंडली गणेश मूर्ती साकारल्या. ‘डीबी स्टार’च्या या अभियानामुळे पर्यावरण संवर्धनाला हातभार लागणार आहे.
- मनीषा चौधरी, संचालिका, दीपशिखा फाउंडेशन

विद्यार्थ्यांनी साकारले बाप्पा
- शाळकरी मुलांना सोप्या पद्धतीने सांगितलेल्या गोष्टी लवकर समजतात. प्रशिक्षणात विद्यार्थ्यांनी खूप सुंदर मूर्ती बनवल्या. ‘डीबी स्टार’च्या अभियानामुळेच हे शक्य झाले.
- गोकुळ पैठणकर, मूर्तीकला प्रशिक्षक
बातम्या आणखी आहेत...