आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरणपूरक बाप्पांची मोहीम फत्ते! शाडू मूर्ती चढ्या भावाने, तर पीओपी बजेटमध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विघ्नहर्ता गणराय आज घरोघरी विराजमान झाले. शाळांमध्ये गुरुजी बाईंनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती स्थापन करण्याचा आदेश या बच्चे कंपनीने पर्यावरण रक्षणाच्या चळवळीत बदलला. त्यांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची स्थापना करीत ही मोहीम खऱ्या अर्थाने यशस्वी केली. घराघरांतून शाडूच्या गणेशमूर्ती स्थापन झाल्याचे बघायला मिळाले. तर व्यापारी प्रतिष्ठाने, संस्था-संघटना आणि मंडळांचे बाप्पा पीओपीचे होते. ६० टक्के शाडूमूर्ती, तर ३० टक्के पीओपीच्या मूर्ती विक्री झाल्या. तथापि, पर्यावरणाचे प्रेम मध्यमवर्गीयांच्या खिशाला झळ पोहोचवणारे ठरले.

एकीकडे पर्यावरणपूरक गणेशाचा कार्यशाळांतून बोलबाला झाला. पण प्रत्यक्ष विक्रीच्या ठिकाणी चित्र निराळेच होते. पीओपीच्या गणेशाच्या तुलनेत शाडूची मूर्ती अतिशय कमी खर्चात तयार होते. पण, बाजारात त्याची मागणी प्रचंड असल्याने चढ्या भावात विक्री झाली. त्यामुळे इच्छा असूनही मध्यमवर्गीय भाविकांना पर्यावरणपूरक गणेश स्थापन करणे शक्य झाले नाही.
पाचपटलागतो खर्च : पीओपीचीमूर्ती डायमध्ये सेट होते. साच्यातून बाहेर काढल्यावर ती तुटली तरी एका ‘टचअप’मध्ये ती पुन्हा सुंदर रूप घेते. पण शाडू मातीच्या १० मूर्ती बनवायला घेतल्या तर विक्रीपर्यंत त्यातील निम्म्या मूर्ती तुटतात. याशिवाय रंगरंगोटी, कारागिराची मेहनत खर्च पीओपीच्या तुलनेत जास्त येतो. मातीची मूर्ती नाजूक असल्याने सांभाळणे कठीण होते. पॅकिंगवरही विशेष खर्च होतो. त्यामुळे खर्च अधिक येत असल्याने या मूर्ती तुलनेने महाग आहेत. हा खर्च नको असल्यास मध्यमवर्गीय कुटुंबांनी कार्यशाळेत सहभागी होऊन स्वत: अगदी स्वस्तात मूर्ती बनवणे हिताचे ठरते. २५ रुपये किलोप्रमाणे माती मिळते, असे विक्रेते प्रभू इंगळे यांनी सांगितले.

भाविकांत अपूर्व उत्साह : टीव्हीसेंटर, गजानन महारात मंदिर, संग्रामनगर उड्डाणपूल, त्रिमूर्ती चौक, शिवाजीनगर, शहागंज, औरंगपुरा अशा विविध ठिकाणी गणेशमूर्तींचे स्टॉल्स लागले होते. सकाळपासून दुपारी वाजेपर्यंत भाविक सहकुटुंब बाजारपेठेत मूर्ती खरेदीसाठी आले. तर त्यानंतर मात्र मंडळांचा जल्लोष सुरू झाला. ढोलताशांच्या गजरात 'गणपत्ती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गुलालाची उधळण करत तरुणाईने परिसर दणाणून सोडला होता. रस्त्यांवरील खड्ड्यांतून वाट काढत तरुणाई अपूर्व उत्साहात गणरायाला स्थानापन्न केले.
पहिली मागणी शाडूच्या मूर्तीलाच
शाडूमातीच्या तुलनेत पीओपीच्या मूर्ती स्वत: आणि सुबक आहेत. पण, पर्यावरणपूरक उत्सवाची लाट आल्याने प्रत्येक ग्राहक शाडू मूर्तीविषयी विचारत होता. बाजारपेठ फिरल्यावर परवडण्यासारखी मूर्ती मिळाली नाही तरच आमच्या पीओपीच्या मूर्ती घेतल्या गेल्या. आम्ही स्वत: काही मूर्तिकारांकडून शाडूच्या मूर्ती ऑर्डर देऊन बनवून घेतल्याचे सुरेश परदेशी यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...