आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोषी शिक्षण संस्थांवर कारवाई करा : कोर्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पटपडताळणीत दोषी आढळलेल्या शैक्षणिक संस्थांवर आगामी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. रवींद्र घुगे यांनी दिले आहेत. जयकुमार जाधव व ब्रिजमोहन मिर्शा यांनी 2012 मध्ये जनहित याचिका दाखल करून दोषी शाळांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. महसूल विभागातर्फे 3 ते 5 ऑक्टोबर 2011 मध्ये पटपडताळणी झाली होती. विद्यार्थी संख्या बोगस दाखवून शासनाचा निधी लाटल्याचे यात निष्पन्न झाले होते. शासनाने 2 मे 2012 रोजी दोषी शिक्षण संस्था, संस्थाचालक व कर्मचार्‍यांवर कारवाईचा निर्णय घेतला. त्यावर संस्थाचालकांनी न्यायालयात दाद मागितली, परंतु दोषींवर कारवाईची मागणी करणारी जनहित याचिका शासन निर्णयापूर्वीच दाखल झाली होती.