आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Educational News In Marathi, School Tribunal Issue At Aurangabad, Divya Marathi

औरंगाबादमध्‍ये प्रलंबित प्रकरणांचे ‘शाळा न्यायाधिकरण’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैंरगाबाद- खासगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये दाद मागावी लागू शकते. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने विभागीय शाळा न्यायाधिकरण स्थापन केले आहेत. प्रत्येक न्यायाधिकरणात एका दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) स्तरावरील पीठासीन अधिकारी म्हणून तीन वर्षांची नियुक्ती केली जाते. निलंबित किंवा बडतर्फ करण्यात आलेले किंवा रखडलेल्या पदोन्नत्या इत्यादींबाबत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी येथे दाद मागू शकतात. निलंबित झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत येथे वकिलामार्फत दावा करावा लागतो, अशी अट घालण्यात आली आहे.
एक वर्षापासून पद रिक्त
मे 2013 पासून पीठासीन अधिकारी पद रिक्त आहे. नाशिक येथील शाळा न्यायाधिकरणाचे पीठासीन अधिकारी चकोर बाविस्कर यांच्याकडे प्रभार सोपवण्यात आला आहे. मे 2013 पर्यंत येथे पीठासीन अधिकारी पदावर आशुतोष भागवत कार्यरत होते. मात्र, त्यानंतर हे पद रिक्त ठेवण्यात आले आहे. नाशिकचे प्रभारी अधिकारी औरंगाबादला कधीच येत नाहीत. त्यामुळे पक्षकारांना सुनावणीसाठी नाशिकला खर्च करून जावे लागते.
प्रलंबित प्रकरणे धूळ खात पडून
1982 मध्ये औरंगाबाद येथील शाळा न्यायाधिकरणाची स्थापना करण्यात आली होती. पूर्वी याअंतर्गत मराठवाड्यातील सर्वच जिल्हे येत होते. मात्र, 8 वर्षांपूर्वी लातूर येथे शाळा न्यायाधिकरणाची स्थापना करण्यात आल्याने आता औरंगाबाद कार्यालयाकडे औरंगाबाद, जालना आणि बीड हे तीन जिल्हेच आहेत. तरीही येथील प्रलंबित प्रकरणांची संख्या 265 च्या वर आहे. गेल्या दोन वर्षांत प्रकरणे निकाली निघण्याचे प्रमाण नगण्य आहे. 15 वर्षे जुनी प्रकरणे अजूनही प्रलंबित आहेत.
कर्मचार्‍यांच्या भरवशावर कार्यालय
या कार्यालयात एकू ण 6 जणांचा कर्मचारी वर्ग आहे. त्यात दोन लिपिक, एक लघुलेखक आणि तीन शिपाई यांचा समावेश आहे. पीठासीन अधिकारी पद रिक्त असल्याने याच कर्मचार्‍यांच्या भरवशावर कार्यालयाचा डोलारा आहे. या कार्यालयाचा कारभार शिक्षण विभागाअंतर्गत चालतो. मात्र, 1982 पासून ते आजपर्यंत एकाही शिक्षण उपसंचालकाने या कार्यालयाला भेट दिली नसल्याचे डीबी स्टारच्या तपासात आढळून आले आहे.