Home »Maharashtra »Marathwada »Aurangabad» Egg Thrown On House In Aurangabad

वरकरनगरात टवाळखोरांकडून लोकांच्या घरांवर अंड्यांचा मारा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

प्रतिनिधी | Mar 20, 2017, 11:55 AM IST

  • वरकरनगरात टवाळखोरांकडून लोकांच्या घरांवर अंड्यांचा मारा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
औरंगाबाद- सिडकोएन-५ मधील एका उच्चभ्रू वसाहतीत टवाळखोर दोन दिवसांपासून घरांवर अंडी फेकत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. हा प्रकार थांबवण्यासाठी नागरिक रात्री जागून काढत आहेत. नगरसेवक शिवाजी दांडगे यांच्या मदतीने पोलिसांत तक्रारही दिली. पण वेळ बदलून अंडी फेकण्याचा प्रकार सुरूच आहेत.

सावरकरनगरात धूलिवंदनाच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळपासून हा प्रकार सुरू आहे. प्लॉट क्रमांक १०६ मधील रहिवासी सुजाता प्रताप देशमुख यांच्या घरापासून हा प्रकार सुरू केला. १४ मार्च रोजी सायंकाळी त्यांनी घराचा दरवाजा उघडला असता त्यांच्या सुरक्षा भिंतीवरील फुलझाडांच्या तीन कुंड्या फुटलेल्या आढळल्या. तसेच दारात फुटलेल्या अंड्यांचा खच होता. देशमुख यांनी हा प्रकार शेजाऱ्यांना दाखवला. त्याच रात्री गल्लीतील नागरिकांनी उशिरापर्यंत पाळत ठेवली. त्यामुळे माथेफिरूने दुसऱ्या गल्लीत अापला मोर्चा वळवला.

रविराज वैजापूरकर यांच्या घरावरही अंडी फेकली. दोन्ही घटनांनंतर कॉलनीतील रहिवाशी एकत्र आले. त्यांनी ही बाब नगरसेवकाला सांगितली. पोलिस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी तातडीने परिसरात गस्त वाढवली. मात्र, नागरिकांचा पहारा आणि पोलिसांची गस्त पाहून अंडी फेकण्याच्या वेळांत बदल केला. पुन्हा १६ मार्च रोजी रात्री बारानंतर देशमुख यांच्या घरावर अंडाफेक करण्यात आली. हा प्रकार थांबवण्यासाठी नागरिकांनी रविवारी सकाळी बैठक घेतली.

- टवाळखोरकॉलनीतील रस्त्यांवर कर्णकर्कश आवाजाने जोरजोरात वाहने पळवतात.
- सुजातादेशमुख, रहिवासी

- नागरिकांनी तक्रारदिल्यानंतर सावरकरनगरात गस्त वाढवण्यात आली. तसेच बीट मार्शल आणि दामिनी पथकालाही सूचना देण्यात आली. आता पुढील कारवाई करण्यात येईल.
- कैलासप्रजापती, पोलिस निरीक्षक, सिडको

- एका घरातदगड आला तर आमची सर्व कॉलनी जमा होते. वर्दळीचा रस्ता आणि जवळच शाळा आहे.
- कस्तुरीव्यास, रहिवासी

कॅनॉटमध्ये पोलिसांनीकेलेल्या कारवाईनंतर टवाळखोरांनी घरांवर अंडी फेकण्याचा प्रकार सुरू केला आहे.
- डॉ.अंजली भालचंद्र, रहिवासी

Next Article

Recommended