आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठ महिन्यांच्या मुलीचा खून, वाळूच्या ढिगाऱ्यात आढळला मृतदेह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- ऐननवरात्र काळात मंगळवारी अशोक चौक परिसरात एका आठ महिन्यांच्या मुलीचा मृतदेह आढळला. नव्याने बांधकाम सुरू असलेल्या हिदायत नावाच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर वाळूच्या ढिगाऱ्यात हा मृतदेह आढळला. त्यानंतर परिसरात बातमी पसरली. दरम्यान, हा खून त्याच इमारतीत मजूरकाम करणाऱ्या इमाम सय्यद याने केला असून ती त्याचीच मुलगी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
भावनाऋषी हॉस्पिटलसमोर नव्याने उभारण्यात येत असलेली इमारत आसिफ इस्माईल शेख यांची आहे. सकाळी बांधकामावर पाणी टाकण्यास वाॅचमन वर अाला असता हा प्रकार उघड झाला. मध्यरात्री दोनच्या सुमारास इमारतीतून एक इसम पळून जाताना पाहिल्याचे वाॅचमनने सांगितले. तपास अधिकारी पोलिस निरीक्षक सोनोने त्यांच्या पथकाकडून अधिक तपास सुरू आहे.

सोमवारी कामावर नव्हता संशयित
त्याइमारतीचे बांधकाम करणारा मजूर इमाम सय्यद हा घटना घडलेल्या दिवशी कामावर गैरहजर होता. तो त्याची पत्नी रुक्साना मुलगी मझबाह, सासूसह कुंभारी येथे तात्पुरते भाड्याने राहतात. २० ऑक्टोबरच्या रात्री १२ च्या सुमारास इमामने दारूच्या नशेत पत्नीसोबत भांडण केले. रागाच्या भरात दारूच्या नशेत स्वत:ची मुलगी मिझबाहला घटनास्थळी आणून मारले असावे.

१० तासांत तपास
घटनेचेगांभीर्य ओळखून पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर, अधिकारी काझी, शर्मिष्ठा वालावलकर यांनी घटनास्थळी भेट दिेली. ठसे तज्ञांना पाचारण केले होते. सकाळी आठ वाजता समोर आलेल्या घटनेचा अवघ्या १० तासांत तपास लावण्यात आला आहे. इमारतीचे मालक आसिफ इस्माईल शेख (वय ३१, रा. घर नंबर ९५, संगमेश्वर नगर) यांनी फिर्याद दिली असून जेलरोड पोलिसात याची नोंद झाली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राठोड करत आहेत.

तपासात बऱ्याच बाबी समोर येतील
सकाळीफोन आल्यावर ताबडतोब घटनास्थळी आलो. परिस्थिती खूप वाईट होती. सर्वसाधारण ते १० महिन्यांच्या मुलीला वाळूच्या ढिगाऱ्यात दाबून ठेवण्यात आल्याचे दिसले. मुलीच्या छातीवर दाब देऊन मारण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. संशयित आरोपी इमाम हा फरार आहे, तपास सुरू आहे. यात बऱ्याच बाबी समोर येतील. श्री.सोनोने, तपास अधिकारी
बातम्या आणखी आहेत...