आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Eight Thousand Agriculture Water Pump In Jayakwadi Dam , Paithan

आठ हजार कृषी पंपाने होतो जायकवाडीतून पाणी उपसा, पिण्याचे पाणी राखीव ठेवण्याची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - पावसानेओढ दिल्याने जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ४८ तासांत मृत साठ्यावर येण्याची शक्यता आहे. टंचाईच्या या भीषण परिस्थितीतही जायकवाडीतून हजारांपेक्षाही जास्त कृषी पंपातून पाणी उपसा चालू आहे. दिवसेंदिवस पाणी उपशात वाढ झाल्यास जायकवाडीचा साठा राखीव ठेवण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

अद्याप कृषी पंप काढण्याचे आदेश आले नसले तरी धरणाचा साठा मृत साठ्यावर आल्यानंतर शेतीचा पाणीपुरवठा बंद केला जातो. जायकवाडीच्या पाण्यावर मराठवाड्यातील लाख ८३ हजार ३२२ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. यंदा दोन वेळा पाणी सोडण्यात आल्याने पैठण, शेवगाव, अहमदनगर, औरंगाबाद, परभणी जिल्ह्यातील ४० हजार हेक्टरवर शेती पाण्याखाली आली.
दोन्ही कालवे बंद झाले तर धरणातून पैठण तालुका अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी पाइपलाइनच्या साह्याने शेतीला पाणी वर्षभर घेतात. मात्र, धरणाचा साठा मृत साठ्यावर आल्यानंतर धरणाच्या बॅक वॉटर क्षेत्रातील सर्व कृषी पंप काढावे लागतात.तीन वर्षांपासून उन्हाळ्याच्या शेवटी धरणाचा साठा मृत साठ्यावर आहे. तिन्ही वर्षी धरणातील मोटारींचा पाणीपुरवठा पाटबंधारे विभागाने बंद केला होता. यंदा हीच वेळ आली आहे. दोन दिवसांत आठ हजार कृषी पंपांचा पाणीपुरवठा बंद करावा लागणार आहे. त्यामुळे शेतकरी अडचणी सापडतील.

पहिला हक्क शेतकऱ्यांचा
जायकवाडी धरणाची निर्मिती ही शेतक-यांना डोळ्यासमोर ठेवून झाली. त्यामुळे पाण्यावर पहिला हक्क हा शेतकऱ्यांचा आहे. शेतीला पाणी देणे आवश्यक आहे. शेतक- यांचे पाणी बंद करून शासन शेतक-यांना देशधोडीला लावणार आहे काय? आबासाहेबमोरे, शेतकरी
सध्याचा पाणीसाठा : अर्ध्याटक्क्यापेक्षा कमी

बागायतीचे क्षेत्र धोक्यात
औरंगाबाद,नगर जिल्ह्यांतील सर्वात जास्त शेतकरी धरणाच्या पात्राखाली वर्षभर फळबागा अन्य पिके या पाण्यावर घेतात. भर उन्हाळ्यात ही धरणाच्या पट्ट्यातील शेती हिरवीगार राहिली. सध्या मोठ्या प्रमाणात धरणाचे पाणी घेणाऱ्या शेतक-यांची पूर्ण शेती पाण्याखाली आहे. आता पिकाला पाणी मिळणार नाही. त्यामुळे शेतक-यांच्या हाती आलेले पीक वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

...तर शेतीचे पाणी बंद करू
जायकवाडीची स्थिती
धरणाचाएकूण पाणीसाठा : २,९०९ दलघमी
उपयुक्त पाणीसाठा : २,१७१ दलघमी
मृत पाणीसाठा : ७३८ दलघमी

४८ तासांत धरणाचा साठा मृत साठ्यावर येईल. त्यानंतर कृषी पंपांचा पाणीपुरवठा बंद केला जाईल. अद्याप पाटबंधारे विभागाच्या सूचना आल्या नसल्या तरी मृत साठ्यात पाणी आल्यावर शेतीचे पाणी बंद केले जाते. अशोकचव्हाण, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग

भिजणारे क्षेत्र हेक्टरमध्ये
- जिल्हाक्षेत्र (हेक्टर)
- औरंगाबाद९,०५२
- जालना ३६,५८०
- परभणी ९७,४४०
- अहमदनगर २,२००
- बीड ३७,९७९
- एकूण१,८३,३२२