आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Eight Thousand Half Crores The Cost By Monsoon In Aurangabad

मान्सूनच्या दगाफटक्याने झाले साडेआठ हजार कोटींचे नुकसान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मान्सूनने यंदाही मराठवाड्याला दगा दिला आहे. ३७ लाख ७७ हजार हेक्टरवरील ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, तूर, कपाशी, सोयाबीन या मुख्य पिकांचे ७० ते ८० टक्के नुकसान झाले आहे. तसा अहवाल कृषी विभागाने तयार केला असून तो दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाला सादर करण्यात आला आहे. पावसाअभावी साडेआठ हजार कोटींचे नुकसान होणार असल्याचे अहवालावरून दिसून येते. प्रकल्पात जलसाठा चाऱ्याचे क्षेत्र अत्यल्प आहे. त्यामुळे आतापासूनच पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे.

मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येला मान्सूनने मराठवाड्यात हजेरी लावली. २० जूनपर्यंत बहुतांश ठिकाणी पाऊस पडला. पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी सरासरी ४२ लाख ४० हजार हेक्टरपैकी ३७ लाख ५५ हजार हेक्टरवर पेरणी उरकली. वेळेवर पाऊस पडल्यामुळे १.४७ लाख हेक्टरवर मूग, १.०९ लाख हेक्टरवर उडीद, १२.८५ लाख हेक्टरवर सोयाबीन, १४ लाख १८ हजार हेक्टरवर कपाशी, लाख ३१ हजार हेक्टर मका, लाख हेक्टर ज्वारी, लाख २१ हजार हेक्टर बाजरी आणि लाख ०६ हजार हेक्टरवर पेरणी करण्यात आली. ते २० जूनदरम्यान झालेल्या पावसाने पिकांची उगवण चांगली झाली होती. २० जून ते ऑगस्टदरम्यान पाऊस पडला नाही. १० ऑगस्टपर्यंत २२ तालुक्यांत केवळ २५ टक्के, ३७ तालुक्यांत २६ ते ५० टक्के, १२ तालुक्यांत ५१ ते ७५ टक्के आणि तालुक्यांत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडला. सलग ४५ दिवसांतील पावसाच्या विक्रमी खंडाने कोवळी पिके होरपळून गेली. तग धरून असलेली भारी जमिनीतील पिकांची पाण्याअभावी वाढच झाली नाही. पेरणीयोग्य पाऊस पडलाच नाही. यामुळे १३ लाख ४८ हजार हेक्टरवर पेरणी होऊ शकली नाही. ऑगस्टपासून पावसाचे पुनरागमन झाले. पण दुबार पेरणीची वेळ निघून गेली आहे.

पीक जागीच जळून गेल्याने त्यांना परत पालवी फुटणार नाही. भारी जमिनीतील जी पिके मरायला टेकली होती ती पाण्यावाचून वाया जाण्याच्या मार्गावर होती. अलीकडे झालेल्या पावसाने त्यांना जीवदान मिळाले हे खरे असले तरी त्यांची वाढ, त्याला लगडणारी फुले, फळे लागण्याचे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत खाली येणार आहे. त्यामुळे ७० टक्के नुकसान होणार हे निश्चित मानले जात आहे. तसा अहवाल कृषी विभागाने तयार केला आहे.

असा होणार परिणाम
उत्पादकांचाउत्पादन खर्चही भरून निघणार नाही. उत्पन्नच होणार नसल्याने घेतलेले कर्ज फेडण्यास अडचणी. कुटुंबाचा वार्षिक खर्च, ज्यामध्ये मुला-मुलींचे शिक्षण, लग्न, आरोग्य, दैनंदिन गरजांच्या पूर्ततेची काळजी बळीराजाला वर्षभर भेडसावणार आहे.

पावसाअभावी उत्पादकतेत ८० टक्क्यांपर्यंत घट निश्चित मानली जात आहे. त्याचा बाजारपेठ, प्रशासन, राज्य राष्ट्रीय उत्पन्नावर परिणाम होणार आहे. केंद्र राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडणार आहे.

पिण्याचे पाणी, चाऱ्याचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करणार आहे.
पिकाचे पेरणी सरासरी अपेक्षित खंड येणारे सरासरी नुकसान
नाव क्षेत्र उत्पादकता उत्पन्न उत्पन्न उत्पन्न दर (कोटींत)

- मूग१.४७ ४०० ५८८०० १७६४० ४११६० ४५०० १८५
- उडीद १.०९ ४०० ४३६०० १३०८० ३०५२० ५००० १५२
- सोयाबीन १२.८५ १००० १२८५००० २५७००० १०२८००० ३००० ३०८४
- कापूस १४.१८ ८०० ११३४४०० ३४०३२० ७९४०८० ४००० ३१७६
- मका २.३१ २४०० ५५४४०० १६६३२० ३८८०८० १२०० ४६५
- बाजरी १.०६ १००० १६०००० ९६००० ६४००० १००० ९६
- तूर ३.३५ -- -- -- -- -- ७७१ कोटी
- ज्वारी १.२१ -- -- -- -- -- ३०० कोटी