आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाथांच्या 2 पालख्यांचे आज पंढरीकडे प्रस्थान; वंशजांच्या वादामुळे पैठणमध्ये संभ्रम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण - शांतिब्रम्ह संत एकनाथांची पालखी शनिवारी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. दरम्यान, नाथवंशज व दत्तकपुत्र वेगवेगळ्या पालख्या काढणार असल्याचे वृत्त आहे. यामुळे कोणत्या पालखीत सहभागी व्हायचे याबद्दल वारकर्‍यांत संभ्रम आहे. या दोन्ही पालख्यांचे मार्गसुद्धा भिन्न असतील. 21 दिवसांच्या पायी प्रवासानंतर पालख्या पंढरपूरमध्ये दाखल होतील.

कोर्टाने दत्तकपुत्र ठरवलेले रघुनाथबुवा पालखीवाले यांना पालखीचा मान दिला असून, पालखी व पादुका घेताना वाद उफाळू नये म्हणून रघुनाथबुवा यांनी कोर्टाकडे पोलिस संरक्षणाची मागणी केली होती. त्यानुसार पालखी प्रस्थान होईपर्यंत पोलिस संरक्षण देण्यात येणार असल्याने यंदा प्रथमच हा सोहळा पोलिस संरक्षणात होत आहे.