आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • El Nino Concern: Skymet Too Raises Monsoon Alarm News In Divya Marathi

सावधान! अल निनो महागाई आणतोय!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - भारतातील पावसावर परिणाम करणारा अल निनो सक्रिय होण्याचे संकेत भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आले. बँक ऑफ अमेरिका-मेरिल लिंचने ही शक्यता लक्षात घेऊन देशातील महागाई 8 ते 10 टक्क्यांवर जाईल असा अंदाज बुधवारी व्यक्त केला. जागतिक स्तरावर नावलौकिक असलेल्या बँक ऑफ अमेरिका-मेरिल लिंच संस्थेने व्यावसायिकांना हवामान खात्याच्या अंदाजाकडे बारकाईने लक्ष देण्याचे सुचवले आहे. एप्रिलच्या मध्यात हवामान खाते मान्सूनविषयक पहिला अंदाज व्यक्त करते. त्यात अल निनोविषयक भाष्याकडे विशेष लक्ष देण्याचे संस्थेने म्हटले आहे.

अल निनो म्हणजे
अल निनो प्रशांत महासागरातील उष्ण समुद्री प्रवाह आहे. मध्य-पश्चिम प्रशांत महासागरावर सक्रिय झाल्यास पाण्याचे तापमान वाढते. भारतात येणारे मोसमी वारे महासागराच्या या भागावरून वाहतात. अल निनो सक्रिय असल्यास बाष्प कमी होते व भारतात पाऊस पडत नाही.

महागाईचा संबंध
अल निनोमुळे भारतात मे ते जून या मोसमी पावसाच्या काळात पाऊस पडत नाही. हा काळ खरिपाचा असतो. पावसाअभावी खरिपातील अन्नधान्य, भाजीपाला व फळांचे उत्पादन घटते. परिणामी मागणी-पुरवठा हे भाव ठरवणारे समीकरण बिघडते आणि महागाई वाढते.

ला निनो हवा
अल निनोच्या विरुद्ध परिणाम करणारा घटक म्हणजे ला निनो. ला निनो प्रवाहामुळे महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान 3 ते 5 अंश सेल्सियसने कमी होते. भारतातील मान्सूनसाठी हे वातावरण पोषक मानले जाते, त्यामुळे अल निनो नको, ला निना हवा असे या क्षेत्रातील जाणकार म्हणतात.