आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • El Nino News In Marathi, Weather , World Meterological Organisation, Divya Marathi

‘अल निनो’च्या प्रभावामुळे मान्सून आठवडाभर लांबणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - यंदाच्या मान्सूनवर ‘अल निनो’चा प्रभाव पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वर्ल्ड मेटरॉलॉजिकल ऑर्गनायझेशनने ‘अल निनो’संदर्भात सतर्कतेचा इशारा दिला आहे. गारपीट, लांबलेला उन्हाळा, तापमानात सातत्याने होणारा चढ-उतार यामुळे जिल्ह्यासह मराठवाड्यातील मान्सूनवरही प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असून मान्सून आठवडाभर लांबेल. हा अंदाज एमजीएमच्या खगोलशास्त्रीय अंतराळ संशोधन केंद्राचे संचालक र्शीनिवास औंधकर यांनी व्यक्त केला आहे.


या वर्षी उन्हाळा उशिरा सुरू झाला. त्यातही दोन दिवसांचा अपवाद सोडला तर तापमान 40 अंशाच्या पुढे सरकले नाही. आतापर्यंत 3, 14 एप्रिल या दोन दिवसांत मराठवाड्यात तापमान 40 अंश सेल्सियसच्या वर गेले होते. याबाबत औंधकर म्हणाले, यावर्षी तापमान फारसे वाढले नाही. आद्र्रतेतही मोठय़ा प्रमाणात बदल होत आहे. सकाळी तापमान कमी राहते. हिमाचल प्रदेशमध्ये देखील बर्फवृष्टी झाली आहे. तापमान कमी राहिल्यामुळे आणि हवामानातील बदलामुळे मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता आहे.


खरीप पेरणी लांबणार
मान्सून लांबणीचा सर्वाधिक परिणाम कृषी क्षेत्रावर होऊ शकतो. याबाबत कृषितज्ज्ञ विजयअण्णा बोराडे म्हणाले, मान्सून लांबल्यास त्याचा फटका पेरणीला बसू शकतो. साधारण: 7 जून ही मान्सून आगमनाची वेळ मानली जाते. मात्र, 7 जूनला मान्सून दाखल होत नाही. त्यामुळे 15 जूनपर्यंत मान्सून दाखल झाला तरी फारसा फरक पडणार नाही. मात्र, त्यानंतर मान्सून लांबला तर त्याचा परिणाम पिकाच्या पेरणीवर होऊ शकतो. विशेषत: कापूस हे नगदी पीक असल्यामुळे शेतकर्‍याचा कल त्याच्याकडे असतो, असे ते म्हणाले.


गारपिटीचा परिणाम जाणवणार
पॅसिफिक आणि अटलांटिक महासागर यांच्या पृष्ठभागावर तापमान वाढ झाल्याचे आढळते. त्याचा परिणाम ‘अल निनो’च्या माध्यमातून आढळतो. तर राज्यात बदलत्या हवामानामुळे झालेल्या गारपिटीचा फटकादेखील मान्सूनला असू शकतो. गारपिटीमुळे मान्सून लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. गारपिटीमुळे हवामानात मोठय़ा प्रमाणात बदल झाले आहेत. ऐन उन्हाळ्यातदेखील गारपीट आणि पाऊस झाल्यामुळे त्याचा परिणाम तापमानावर झाला आहे. 2013 मध्ये औरंगाबाद जिल्ह्यात एक हजार मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाला होता.


अंदाज अशक्य
‘आयएमडी’च्या मान्सूनबाबत 20 एप्रिलला अंदाज वर्तवला जातो. ‘अल निनो’च्या प्रभावाबाबत अंदाज वर्तवण्यात येत आहेत. मात्र, 20 एप्रिलनंतर त्याबाबत अंदाज वर्तवता येईल. उन्हाळा आणि गारपिटीचा परिणाम मात्र जाणवणार असल्याचे मत हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केले आहे.


अल निनो हा उष्ण समुद्री प्रवाह
‘गोदावरी पाटबंधारे’ बाहेरील फलकावर बुधवारी दुपारी 40 अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले.