आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल निनोची जागतिक पातळीवर गंभीर दखल, 196 देशांचा पुढाकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पॅसिफिक अर्थात प्रशांत महासागरातील वाढते तापमान सध्या जगाच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. या तापमानवाढीमुळे प्रशांत महासागरात निर्माण होणाऱ्या अल-निनो इफेक्टमुळे जगभरातील हवामानाचे संतुलन बिघडत आहे. हा अल निनोचा परिणाम यंदा पॅरिसमध्ये डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामानविषयक परिषदेतही गांभीर्याने चर्चिला गेला.

त्यावरील उपायही सुचवण्यात आले. या परिषदेला उपस्थित संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामानविषयक कार्यक्रमाचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य, समन्वयक राजेंद्र शेंडे उपस्थित होते. त्यांनी ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत परिषदेमध्ये अल-निनोवर झालेल्या चर्चेबद्दल माहिती दिली...

पॅरिस येथे ३० नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०१५ दरम्यान झालेल्या या परिषदेमध्ये अल निनो हा विषय केंद्रस्थानी होता. अल निनोमुळे जगाच्या हवामानावर होणारे परिणाम व उपाय यावर खूप मंथन झाले. प्रगत देश आणि प्रगतिशील देशांनी काही जबादाऱ्या या निमित्ताने वाटून घेतल्या.
शेंडे यांनी सांगितले, हल्ली पाऊस कधीही पडतोय. कुठे अति पाऊस तर कुठे अतिदुष्काळ, तर युरोपीय खंडात कुठे अतिबर्फवृष्टी तर कुठे तापमान अचानक वाढत आहे. याला अल निनोच कारणीभूत आहे.

अल निनो हा स्पॅनिश शब्द आहे प्रशांत महासागराचे तापमान वाढले, तर त्या ‘अल निनो’ व कमी झाले तर ‘ला निनो’ म्हणतात. हा फरक १६ व्या शतकात प्रथम लक्षात आला पण त्याचे मोजमाप किंवा निरीक्षणांच्या नोंदी १८ व्या शतकापासून ठेवण्यास सुरुवात झाली. कारण या बदलांचा संपूर्ण जगाच्या हवामानावर परिणाम होऊ लागला.

अल निनोला भारत सरकारने गांभीर्याने घ्यावे
राजधानी दिल्लीत प्रचंड प्रदूषण आहे. हे प्रमाण ३६० पीपीएम आहे. मात्र, सरकारी पातळीवर त्याची गांभीर्याने दखल घेतली जात नाही. या अल निनो परिणामांची दखल घेऊन सरकारने एक बातमीपत्र जारी करावे व उपाययोजना करणारी स्वतंत्र यंत्रणा तत्काळ उभारावी, असेही शेंडे म्हणाले.

येथून पुढे मान्सूनचा लहरीच असणार..
राजेंद्र शेंडे यांच्या अभ्यासनुसार भारतातील हवामान संस्थेच्या अंदाजानुसार (आयअोडी) यंदाचा मान्सून भरपूर अन वेळेवर पाऊस पाडेल असा असला तरी जागतिक हवामान संस्थेच्या भाकिताप्रमाणे (डब्ल्यूएमओ) २०१६ पासून मान्सून अत्यंत लहरी राहील. त्याचा लहरीपणावर उपायोजना करणे हेच शहाणपणाचे ठरेल.

अल निनोचे दुष्परिणाम
> कुठे प्रचंड पाऊस, तर कुठे प्रचंड दुष्काळ
> सर्वाधिक फटका मान्सूनला दरवर्षी पाऊस पडेलच याची शाश्वती नाही
>धूलिकणांचे प्रमाण वाढल्याने वातवरणातील दृष्यमानता कमी होईल फुप्फुसाचे आजार वाढतील
>हवेतील विषारी घटकांमुळे अनेक आजार बळावणार
>अनेक बेटे पाण्याखाली जाण्याची भीती
>निर्वासितांचा प्रश्न भेडसावणार.

उपाय काय...
> सरकारने काळजी घ्यावी. शेतकरी, उद्योजक व सामान्य नागरिकांना हा विषय समजावून सांगावा
>सीएफसी अर्थात क्लोरो फ्लोरी कार्बनचा वापर करून तयार होणाऱ्या फ्रिजचे उत्पादन बंद करावे
>वाहनांचा वापर कमी व्हावा
>कार्बन डाय ऑक्साइडसह मिथेन, नायट्रस ऑक्साइड, यांसारख्या वायूंचे उत्सर्जन कमी करावे.
बातम्या आणखी आहेत...