आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'संडे'च्या मुहूर्तावर प्रचाराचा बार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबादः मनपा निवडणुकीच्या प्रचारातील पहिला रविवार जास्तीत जास्त ताई-माई-अक्कांना हात जोडत तमाम उमेदवारांनी व्यतीत केला. उमेदवारी चनि्ह मिळाल्यानंतरचा पहिलाच दिवस असल्याने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची कसरत बंडखोर उमेदवारांनाही करावी लागली.

मनपा निवडणुकीची खरी रणधुमाळी आजपासून सुरू झाली. रविवारची सुटी म्हणजे मतदार घरी सापडण्याची सुवर्णसंधी असल्याने बहुतेक वॉर्डांत उमेदवारांनी पदयात्रा काढल्या. राजकीय पक्षांचे आणि अपक्ष उमेदवारांनी प्रचार कार्यालयांची उद्घाटने उरकून घेतली.

दारोदार भटकंती सुरू :
रविवारी बहुतेक मतदार सापडण्याची शक्यता असल्याने आज घरोघर जात भेटीगाठी घेतल्या. सिडको, हडको, गारखेडा, पुंडलिकनगरचा टापू, शहरातील उच्चभ्रू वसाहतींमध्ये उमेदवार त्यांचे कार्यकर्ते मतदारांच्या भेटी घेताना दिसत होते. निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर पहिल्याच रविवारी एका उमेदवाराने अशी प्रचार रॅली काढली. शहरभर असेच चित्र होते.

मॉर्निंग वॉकपासून गुड नाइटपर्यंत
मॉर्निंगवॉकला जाणाऱ्या मतदारांना तेथे, नंतर घरी भेटून गुड नाइट करेपर्यंत आज रविवारी प्रचार करण्यात आला. येणाऱ्या आठवड्यात हा प्रचार चांगलाच तापणार असून प्रचाराचा कोलाहल पुढील रविवारी टिपेला पोहोचलेला असणार आहे.

नेते लागले कामाला
रविवारीप्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रचार कार्यालयांची उद्घाटने केली. शिवसेना भाजपच्या निवडणूक समितीतील नेत्यांनी रात्री दहा वाजेपर्यंत विविध वॉर्डांत हे कार्यक्रम हाती घेतले होते. आजच्या पहिल्या सुपर संडेदरम्यान जाणवलेला बदल म्हणजे वॉर्डात नव्याने समाविष्ट झालेल्या भागांत अधिक प्रचार करण्यात आला. वॉर्ड पुनर्रचनेनंतर बहुतेक वॉर्डांच्या सीमा बदलल्या आहेत. नव्याने समाविष्ट या भागांतील मतदारांना भेटण्यावर भर देण्यात आला.

ढोल-ताशे चिन्हांचे झेंडे
उमेदवारांनीढोल-ताशांच्या गजरात पदयात्रा काढल्याने एरवी शांत वाटणाऱ्या वसाहतींत प्रचंड कलकलाट दिसला. खास करून अपार्टमेंटमध्ये जाताना उमेदवार कार्यकर्त्यांची दमछाक झाली.

उन्हापुरता थोडा ब्रेक
आजदिवसभर उन्हाचा तडाखा होता. त्यामुळे सकाळी वाजेपासून प्रचारासाठी बाहेर पडलेल्या उमेदवारांनी मध्यान्हानंतर ब्रेक घेतला. चार वाजेपासून पुन्हा प्रचाराला प्रारंभ केला.