आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक कार्य नसल्याने उमेदवारांना मतदारांची ‘सेवा’ करण्याची संधी मिळेना

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उंडणगाव - सामाजिक कार्यक्रमांमध्ये नेहमी ‘चमकोगिरी’चा कांगावा करणा-या कार्यकर्त्यांना पौष महिन्याने चांगलाच खोडा घातला आहे. 21 डिसेंबर 2011 ते 28 जानेवारी 2012 पर्यंत विवाह तिथी नसल्याने कार्यकर्त्यांची गैरसोय होत आहे.
फेब्रुवारीत होणा-या जि. प. व पं. स. निवडणुकीसाठी नेते व कार्यकर्ते निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. मतदारांना आपुलकी दाखवण्यासाठी लग्न समारंभ, भंडारा, सत्यनारायण आदी सामाजिक कार्यक्रमांत कामापेक्षा ‘चमकोगिरी’ची झलक दाखवण्यात अनेक कार्यकर्ते पुढाकार घेताना दिसतात.या वर्षी पौष महिन्याचा खोडा आल्याने लग्नसराईला हळुवार सुरुवात झाली. 28, 29, 30 जानेवारी व 2, 3 फेब्रुवारीला लग्नतिथी आहेत. त्यामुळे या मोजक्याच तारखांच्या लग्नसोहळ्यांना कार्यकर्त्यांची जोरदार हजेरी राहील. सध्या राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते गट व गणात प्रभावी उमेदवारांच्या शोधात आहेत, तर इच्छुक उमेदवारीसाठी पक्षनेत्यांच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत. दोघांनाही निवडणुकीची लगीनघाई दमछाक करणारी ठरत आहे.
लग्नांना आवर्जून उपस्थिती - गल्लीतील किंवा गावातील लग्न असले की, तिथे कार्यकर्त्यांची चमकोगिरी पाहायला मिळते. कधीही कंबर न वाकवलेले कार्यकर्ते पंगतीत वाढत असतात. राहू द्या, काका.. मी करतो ते काम..! अशा प्रकारे चमकोगिरीचे काम करीत असतात.