आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Commission: Candidate Now Fill Up Relative Asset Details

निवडणूक आयोग : उमेदवारांना आता द्यावी लागेल नातेवाइकांच्या मालमत्तेची माहिती

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - लोकसभेपासून ग्रामपंचायतीपर्यंत निवडणूक लढवताना स्वत:च्या नावे असलेल्या मालमत्तेचा गोषवारा देणे आयोगाने पूर्वीच बंधनकारक केला आहे. आता त्यात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, भाऊ या रक्ताच्या नात्यातील नातेवाइकांच्या नावे असलेल्या मालमत्तेचा गोषवारा देणे आवश्यक करण्यात आले आहे. त्याचबरोबर या नातेवाइकांनी आयकराचे रिटर्न्‍स भरले का, याचीही माहिती द्यावी लागणार आहे.

जिल्हा निवडणूक कार्यालयाला 8 मार्चला केंद्रीय आयोगाकडून तसे पत्र प्राप्त झाले असून येत्या प्रत्येक निवडणुकीत हे शपथपत्र घेतले जाईल, असे निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी शशिकांत हतगल यांनी म्हटले आहे. फक्त उमेदवाराने शपथपत्रावर माहिती द्यायची आहे.