आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Commission Squad Work Issue At Nashik, Divya Marathi

भरारी पथकांकडून होईना प्रचारादरम्यान कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मतदारांना देण्यात येणारी प्रलोभने अथवा कुठल्याही अपप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी नेमण्यात आलेल्या भरारी पथकांकडून कुठलीही कारवाई होत नसल्याने सततच्या फिरस्तीचे चित्रीकरण करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी विलास पाटील यांनी दिले आहेत.

लोकसभा निवडणुकीत मतदारांना देण्यात येणार्‍या प्रलोभनांवर लक्ष ठेवण्यासाठी आयोगाकडूनच भरारी पथके स्थापन करण्याचे आदेश होते. त्यानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय तीन-तीन पथके स्थापन करण्यात आली आहेत. त्यांच्यावर 24 तास नजर ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, प्रचारादरम्यान काही उमेदवारांच्या सर्मथकांकडून मतदारांना आश्वासने-प्रलोभने देण्याचे प्रकार सुरू असताना एकही गुन्हा अथवा तक्रार या पथकांकडून नोंदविण्यात आलेली नाही. या प्रकाराची जिल्हाधिकार्‍यांनी गंभीर दखल घेतली आहे. असे प्रकार घडत नसले किंवा निदर्शनास येत नसले, तरी कमीत कमी तुम्ही फिरस्तीवर आहात याचे चित्रीकरण तर करा. जेणेकरून तसा अहवाल वरिष्ठांना सादर करता येईल, अशा स्पष्ट सूचना विलास पाटील यांनी भरारी पथकांना दिल्या आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक पथकासोबत एक कॅमेरामन आहे. या आदेशामुळे निवडणुकीबाबत गंभीर होण्याचा सल्लाच पाटील यांनी दिल्याचे स्पष्ट होत आहे.