आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीसाठी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये घोळच घोळ, निवडणूक आयोगाकडे दाखल झाली तक्रार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - निवडणूकअर्ज भरायचा, पण मुदत खूपच कमी आहे हे लक्षात आल्याने एका विद्यमान नगरसेविकेने अर्जासोबत अनेक त्रुटी असलेली कागदपत्रे सादर केली आणि निवडणूक लढवली. ही महिला नगरसेविका म्हणून निवडूनही आली. विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर डीबी स्टारने खोलात जाऊन तपास केला. तेव्हा त्यातून या बाबी समोर आल्या. चूक केवळ या महिलेची नाही, तर कागदपत्रे तपासणा-या अधिकारी-कर्मचा-यांचीही आहे. अनेक त्रुटी असतानाही हा अर्ज बाद झाला नाही हे विशेष. प्रश्न या एका प्रकरणाचा नाही, तर सदोष व्यवस्थेचा आहे. कारण उद्या कुणीही येईल आणि व्यवस्थेला हाताशी धरून कसलीही कागदपत्रे सादर करून कुठलेही काम करून घेऊ शकतो. हे प्रकरण वरकरणी साधे वाटत असले तरी खूप गंभीर आहे.

यादवनगर वॉर्ड क्रमांक या एससी प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित असलेल्या वॉर्डातून पुष्पा उत्तम रोजतकर या भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या. त्यांनी मनपाला सादर केलेल्या शपथपत्रात हिंदू चांभार ही जात नमूद केलेली आहे. निवडणूक प्रकियेत अनेक कागदपत्रांची पूर्तता केली, परंतु त्यात अनेक त्रुटी आहेत.

याआहेत आक्षेपार्ह बाबी : मूळच्याजळगाव जिल्ह्याच्या रहिवासी पुष्पा तुकाराम सुरळकर (माहेरचे नाव) यांचा विवाह उत्तम रोजतकर यांच्यासोबत मे १९८३ रोजी भुसावळला झाला. २०१५ च्या निवडणुकीत पुष्पा रोजतकर यांना एससी महिला आरक्षित वॉर्डात निवडणूक लढवण्याची संधी मिळाली. अर्जाबरोबर त्यांनी जातीचे प्रमाणपत्र, विवाह नाेंदणी अशा अनेक कागदपत्रांची पूर्तता केली खरी, पण अनेक संशयास्पद बाबी त्यात राहून गेल्या.

वडिलांनीमुलांचे, तर मुलांनी लावले वडिलांचे प्रमाणपत्र : जातीचेप्रमाणपत्र काढताना साधा नियम असा आहे की, मुलांना जर जातीचे प्रमाणपत्र काढायचे असेल तर त्यांना अर्जासोबत वडिलांचे प्रमाणपत्र जोडावे लागते. मात्र, येथे वेगळीच तऱ्हा बघण्यास मिळते. रोजतकर यांचा मोठा मुलगा राजेश याने १९९० मध्ये प्रमाणपत्र काढले, दुसरा मुलगा राहुल याने २००१ मध्ये जातीचे प्रमाणपत्र काढले, तर मुलगी वर्षा हिने २००३ मध्ये प्रमाणपत्र काढले असल्याचे पुरावे दिले आहेत. या तिघांचे वडील असणारे रोजतकर यांनी मात्र आपले जात प्रमाणपत्र हे २०१० मध्ये काढल्याचे नमूद आहे. जात प्रमाणपत्र काढण्यासाठी चुलते, आत्या आजेाबा यांचे प्रमाणपत्र लावावे लागतात. असा कुठलाही नियम येथे पाळला गेला नाही.

व्हर्जन--टीसीचमूळ पुरावा
आम्हीविवाह नोंदणी करत असताना मुख्य कागदपत्रांमध्ये टीसी हा मुळ पुरावा माणतो. त्यानुसार आम्ही विवाह नोंदणी करून घेतली आहे. बाकीच्या कागदपत्रांचा फार महत्त्व दिले जात नाही. मुकुंदजोशी, विवाह नोंदणी कक्ष प्रमुख, मनपा

५) मुलगा सेतूत कामाला
जातप्रमाणपत्रात अनेक तृटी असल्याचे समोर आल्यानंतर अधिक तपास केला असता नगरसेविकेचा मुलगा हा सेतूमध्ये कर्मचारी होता. त्यांनी या संबंधी सेतू प्रशासनाला माहितीच्या अधिकारात कागदपत्रांची माहिती मागविली असता अपील करुनही अद्याप सेतूने ही माहिती अर्जदाराला दिलेली नाही.

व्हर्जन--आमचेकर्मचारी होते
आमच्यागरवारे स्टेडियम येथील सेतू कार्यालयात राहुल रोजतकर हे काम करत होते.
-श्रीकांतकांबळे, सेतू कार्यालय प्रमुख

६) मनपाने केले हात वर
सुरडकरनावाने केवळ चौथीत महिने लेबर कॉलनी येथील शाळेत शिकल्या. तेथील रजिस्टरवरील नोंदीत काहीच उल्लेख नसल्याने आम्ही पुढील माहिती देऊ शेकत नाही असे मनपाच्या वतीने सांगण्यात आले.

व्हर्जन....
शाळेच्यारेकॉर्डनुसार पुष्पा सुरडकर या अगोदर कोणत्या शाळेत होत्या याचा उल्लेख नसल्याने अधिक माहिती देता येणार नाही. रफीकशेख, रेकॉर्ड देणारे अधिकारी, मनपा

थेटसवाल-आर. एस. राठोड, विभागीय जात पडताळणी अधीक्षक
1. इतरजिल्ह्यातीलरहिवासी व्यक्ती आपल्या जिल्ह्यात जात पडताळणी करू शकते काय ?
>- कारण लोक अनेक वर्षांपासून रहिवासी असतात.
2. रोजतकरयांच्या प्रकरणात पतीचे जात प्रमाणपत्र लावण्यात आले आहे...
-जरत्यांनी सुरुवातीला पतीच्या नावाने १०० रुपयांच्या बॉन्डवर शपथपत्र दाखल केले असल्यास नाव लावू शकतात.
3. रोजतकरयांनी व्हॅलिडिटी करताना मामा, भाच्यांचे प्रमाणपत्र लावले हे योग्य आहे का?
-निवडणुकीच्यावेळी आम्हाला प्रकरण निकाली लावायची असतात. तेव्हा उपलब्ध पुराव्याच्या आधारे आम्ही प्रमाणपत्र देतो. मात्र ते देत असताना संबंधित व्यक्तीच्या माहेरचीच प्रमाणपत्रे बघीतली जातात. कुणाला आक्षेप असल्यास तक्रार करावी आम्ही तपास करु.\\
जात पडताळणी करताना विभागीय जात पडताळणी समितीसमाेर मुळचे जात प्रमाणपत्रासह वडील, काका अन्य असे पाच प्रमाणपत्र लावणे बंधनकारक असते. पण रोजतकर यांनी त्यासाठी लावलेल्या प्रमाणपत्रात वडिलांचे नाव तुकाराम सखाराम चांभार, असे नमूद केले आहे. सोबत तीन भाचे भाऊ याचे नाव सुरळकर असे आहे. येथेच आडनावाची गरबड असताना पुन्हा टीसीत सुरडकर असे तिसरेच नाव आले आहे. या ठिकाणी जात पडताळणी समितीने संपूर्ण कागदपत्रांची तपसणी योग्य पद्धतीने करायला हवी होती.

सत्यसमोर यावे
माहितीच्याअधिकारात अनेक दस्तावेज जमा केले. त्यातून खूप त्रुटी असल्याचे आढळून आले. या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करून १६ प्रकारची कागदपत्रे बनावट संशयास्पद असल्याचे पुराव्यासह तक्रार केली आहे. एकंदरीत सर्व प्रकरणच संशयास्पद असल्याचे आम्हाला कळाले. या प्रकरणात निषपक्ष चौकशी करुन सत्य समोर यायला हवे. अन्यथा आम्ही न्यायालयातही जाण्याची तयारी केली आहे. राजु देहाडे, तक्रारकर्तेे
पुष्पा रोजतकर
नगरसेविका,यादवनगर वॉर्ड क्र. (मुलाच्या वतीने उत्तरे देण्यात आलेली आहेत)

जात पडताळणी समितीला सादर केलेल्या जात प्रमाणपत्रात मुलगा राजेश भाचा योगेश यांचे जात प्रमाणपत्र लावण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र तहसील कार्यालय औरंगाबाद येथून काढले आहे. मात्र, या जात प्रमाणपत्रावर नाव आणि काढण्याची तारीखच नाही. त्यामुळे त्याबाबत संशय बळावतो. यासंदर्भात अधिका-यांनी कुठलीही माहिती देण्यास मात्र नकार दिला.

आपण दिलेल्या प्रमाणपत्रावर तारीख आणि नावे हे स्पष्टपणे दिसत नाही. त्यात हे रेकॉर्ड खूप जुने आहे. योग्य माहिती नसल्याने आम्ही ते शोधू शकत नाही. दिलीपगायकवाड, रॅकार्डरुम कक्ष प्रमुख, तहसील कार्यालय
या आहेत संशयास्पद बाबी
थेट सवाल
४) शपथपत्रावर मुलाची सही : मनपाचेशपथपत्र आईने, तर जात पडताळणी विभागाला सादर केलेल्या शपथपत्रावर चक्क मुलानेच सही केली आहे. परस्पर हे शपथपत्र मुलाच्या सहीने सादर करण्यात आले आहे.
३) पुष्पा सुरळकर यांनी विवाह नोंदणी कार्यालयात दिलेले शपथपत्र हे सुरळकर नावाने दिले आहे, येथे मात्र मनपा अधिका-यांनी टीसीची योग्य नोंद घेऊन विवाह नोंदणी ही टीसीच्या आधारे घेऊन विवाह प्रमाणपत्र हे सुरडकर या नावानेे दिले आहे.
१) शाळासोडल्याच्या प्रमाणपत्रावर तिसरेच नाव :पुष्पा सुरळकर माहेरचे, तर सासरचे नाव पुष्पा रोजतकर असे आहे. मात्र, निवडणूक विभागाला सादर केलेली टीसी ही जामनेरच्या न्यू इंग्लिश हायस्कूलची असून तेथील शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रावर पुष्पा सुरडकर असे नाव आहे. शिवाय लेबर कॉलनीतील जि. प. शाळा आणि कन्या मराठी शाला, जामनेर येथेही त्यांचे नाव सुरडकरच होते.
{ आपले आडनाव सुरळकर आहे, मग टीसीवर का बदलले?
>नाही,ते नजरचुकीने झाले आहे.
आपण इतक्या वर्षांपासून चुक दुरुस्त का केली नाही?
- कारणतशी गरजच पडली नव्हती ना.
आईचे शिक्षण वी पर्यंत जामनेरला झाले. अगोदर थी ७वीचे शिक्षण कुठे झाले?
- सध्यासांगता येणार नाही. (आईला विचारून सांगतो असे ते म्हणाले. मात्र, याला महिना उलटला तरी त्यांनी उत्तर दिलेले नाही.)
आपल्या जातप्रमाणपत्रातही तारखा मागे- पुढे आहेत
- आम्हीशाळेत शिकत असताना जशी गरज पडली तसे प्रमाणपत्र काढले आहे.
बातम्या आणखी आहेत...