आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदानासाठी पूर्ण दिवस भरपगारी सुटीचे आदेश, निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर स्वतंत्र जीआर जारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबादः एप्रिल महिन्यात राज्यात दोन महानगरपालिका, नगर परिषदा तसेच ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून मतदानाच्या दिवशी शासकीय कर्मचाऱ्यांबरोबरच खासगी आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांनाही एक दिवसाची भरपगारी सुटी देण्यात यावी, असा जीआर शासनाने जारी केला आहे.

मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सुटी देणे आवश्यक असल्याचे आयोगाने शासनाला कळवले होते. खासकरून खासगी आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांना सुटी देण्याची सूचना आयोगाने शासनाला केली होती. त्यानंतर शासनाने आदेश जारी केला. निवडणूक निर्णय अधिकारी तसेच पोलिसांनीही या आदेशाचे पालन करावे, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

आतापर्यंत मतदानाच्या दिवशी सुटी द्यावी किंवा दोन तासांचा अवधी देण्यात यावा, असे आयोगाने म्हटले होते. परंतु या वेळी आयोगाने सरसकट सुटी देण्याची सूचना केली. अत्यावश्यक सेवांच्या ठिकाणी दोन तासांची सवलत असावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
यांना द्यावी सुटी : विविधअास्थापना, खासगी दुकाने, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापारी दुकाने, औद्योगिक उपक्रम, मॉल, कॉल सेंटर, रिटेलर्स किंवा अन्य कोणताही खासगी उपक्रम जेथे मजूर किंवा कामगार कामावर आहेत, त्यांना भरपगारी सुटी द्यावी, असे आदेशात म्हटले आहे.

कोणाला दोन तासांची सवलत
राज्यशासन तसेच खासगी उपक्रमांच्या अत्यावश्यक सेवा. जेथे काम बंद ठेवल्याने मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते, अशा कंपन्या किंवा उपक्रम. तेथे कामगारांना त्यांच्या सोयीनुसार दोन तासांचा अवधी देण्यात यावा. त्या कालावधीची सुटी गृहीत धरण्यात येऊ नये.

अधिकाऱ्यांवर जबाबदारी
शासनाच्याया आदेशाचे पालन होते की नाही, याची खातरजमा करण्याची जबाबदारी स्थानिक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. सुटी दिल्याबाबत कोणी तक्रार केली तर लगेच कारवाई करण्यात यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात एका कॉल सेंटरला सुटी देण्यात आली नव्हती. त्यावर कारवाई झाली होती.