आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Division Team, Latest News In Divya Marathi

अबब...29 दिवसांत 1 कोटी 14 लाख जप्त, भरारी पथकाची कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागल्यापासून जिल्ह्यात निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने 1 कोटी 14 लाख रुपयांची रोख रक्कम आणि 76 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
तसेच आचारसंहिता भंगाचे 65 गुन्हे दाखल झाल्याची माहिती आचारसंहिता कक्षाचे प्रमुख उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत यांनी दिली. राज्यात गेल्या 29 दिवसांपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यात यासाठी 27 भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. निवडणुकीत पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो या कारणामुळे भरारी पथके असे प्रकार रोखण्यासाठी विविध ठिकाणी वाहनांची तपासणी करत आहेत. यामध्ये वाहनांची तपासणी करण्यात आली यामध्ये रोख रक्कम, दारू, सोने ताब्यात घेण्यात आले. सध्या पथकाची तपासणी जोरात सुरू आहे. निवडणुकीला अवघे दोन दिवस शिल्लक असताना राज्यात अनेक ठिकाणी रोख रक्कम घेऊन जाणाऱ्यांना पकडले जात आहे. बहुतेक जणांकडे पुरावा नसल्याने रोख रक्कम जप्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे पैसे जवळ बाळगले तर योग्य तो पुरावा असल्यास अडचण राहत नाही.