आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election News In Marath, Law And Order, Criminal, Divya Marathi

निवडणुकीतील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्‍यासाठी गुंडांची धरपकड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह सामाजिक शांतता धोक्यात आणणार्‍या गुंडांची धरपकड सुरू केली आहे. सहायक पोलिस आयुक्त एस.बी.चौगुले यांच्या मार्दर्शनाखाली अधिकारी व कर्मचार्‍यांच्या मोठय़ा फौजफाट्याने रविवारी रात्रभर परिसर पिंजून काढून तब्बल 18 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यातील 7 आरोपींच्या ताब्यातून देशी दारूच्या 453 बाटल्याही हस्तगत केल्या आहेत.


वाळूज औद्योगिक परिसरातील शांतता कायम ठेवण्याच्या उद्देशाने सहायक पोलिस आयुक्त चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली हे कोम्बिंग ऑपरेशन राबवले गेले. रविवार (23 मार्च) ते सोमवार (24 मार्च) पहाटेपर्यंत परिसरातील आसेगाव, साजापूर, वडगाव कोल्हाटी, जोगेश्वरी आदी भागांमध्ये छापे मारण्यात आले. त्या वेळी रेकॉर्डवरील फरार 11 गुन्हेगार आढळून आले. कोंबिंग ऑपरेशनमध्ये बेकायदेशीररीत्या दारू विक्री करणारे दीपक काशीनाथ पारके (रा. आसेगाव), विशाल उत्तम रणदिवे (रा. साजापूर फाटा), श्याम रतन कसबे (आसेगाव), सुनीताबाई युवराज पिंपळे (रा. जोगेश्वरी झोपडपट्टी), लताबाई गोविंद पिंपळे (वडगाव कोल्हाटी), विकास पवन पवार (जोगेश्वरी) व लखन शंकर पिंपळे (रा. जोगेश्वरी) यांना 11 हजार 649 रुपये किमतीच्या एकूण 453 देशी दारूच्या बाटल्यांसह ताब्यात घेण्यात आले.


अशी झाली कारवाई
एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक इंदलसिंग बहुरे, छावणीचे पो.नि.जी.आर.फसले, बेगमपुर्‍याचे पो. नि. एस. एम. परोपकारे उपनिरीक्षक संजय आहिरे, सुरेश खाडे, नरहरी शिंदे, विजयमाला रिठ्ठे यांच्यासह तब्बल 50 कर्मचार्‍यांचा फौजफाटा कोम्बिंग आपरेशन पथकात सहभागी होता. त्यामध्ये ब्लॉकिंग टीम व सर्चिंग टीम असे विभाजन करण्यात आले होते. ब्लॉकिंग टीमकडून पळवाटा अडवण्यात आल्या, तर सर्चिंग टीमने गुन्हेगारांना शोधून त्यांना ताब्यात घेतले. सदरील कारवाई सोमवारी (24 मार्च) पहाटे साडेपाच वाजेपर्यंत करण्यात आली.