आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

7 हजार ग्रा.पं.च्या निवडणुका जाहीर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - राज्यातील 7 हजार 756 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी जाहीर केला. 21 ते 25 ऑगस्ट या काळात नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहेत. नामनिर्देशनपत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र असणे या वेळी बंधनकारक करण्यात आले आहे. 9 सप्टेंबरला मतदान, तर 10 रोजी मतमोजणी होणार आहे. चिन्ह वाटप 29 ऑगस्टला दुपारी होणार आहे. आचारसंहिता 11 ऑगस्टपासून लागू होणार आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान मुदत संपणा-या ग्रामपंचायतींच्या तसेच विभाजनामुळे व नव्याने अस्तित्वात आलेल्या स्वतंत्र ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम मंगळवारी, 1 ऑॅगस्ट रोजी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. निवडणुकीसाठी तीस जूनची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार ऑक्टोबरमध्ये 124, नोव्हेंबरात 4,645, तर डिसेंबरमध्ये 2,987 ग्रा.पं.ची मुदत संपत आहे.