आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Rananiti On Whats App Issue At Nashik, Divya Marathi

निवडणुक रणनिती: विधानसभेसाठीही ‘व्हॉट्सअँप’ रिचार्ज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - लोकसभा निवडणुकीत व्हॉट्सअँपची भूमिका महत्त्वपूर्ण ठरल्यानंतर आता विधानसभेसाठी या माध्यमाचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे. व्हॉट्सअँपला तरुणांचा प्रचंड प्रतिसाद लाभत असल्याचे लक्षात आल्यानंतर मनसेने प्रथमत: त्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी आपल्या आमदारांच्या जाहिरातबाजीबरोबरच मनसेने केलेल्या विकासकामांवर भर दिला जात आहे. विरोधकांच्या टीकेला उत्तरेही दिली जात आहेत.

लोकसभा निवडणुकीत सोशल मीडिया हा परिणामकारक घटक राहिला. संबंधित उमेदवाराच्या प्रचाराबरोबरच विरोधकांच्या अपप्रचारासाठीही या माध्यमाचा उपयोग करण्यात आला. त्यासाठी छायाचित्रे, काटरून्स आणि चित्रफितींचा वापर करण्यात आला. ज्या संदेशांची सार्वजनिक चर्चा करणे नैतिकतेला अनुसरून नसल्याचे बोलले जाते, ते संदेशही व्हॉट्सअँपवर पाठविण्यात आले.
नाशिकमध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे यांच्या बाजूने पारडे झुकण्यासाठी, तसेच विरोधकांचे सुपडे साफ करण्यासाठी ‘व्हॉट्सअँप’ने महत्त्वाची भूमिका बजावली. ही बाब ओळखून आगामी निवडणुकांसाठी आता मनसेने व्हॉट्सअँपचा प्रभावीपणे वापर करण्याचे ठरविले असून, प्रचार करणारे संदेशदेखील फिरायला लागले आहेत.
.असे आहेत संदेश
लोकसभा निवडणुकीत पालकमंत्री छगन भुजबळ यांना विरोधी पक्षातील व्हॉट्सअँप यूर्जसने काही प्रश्न विचारले होते. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांतर्फे या प्रश्नांना उत्तरेही देण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हाच फॉर्मुला समोर ठेवून मनसेने टीकाकारांना काही प्रश्न विचारले आहेत. ‘लक्ष्य विधानसभा’ असे ग्रुपही तयार झाले आहेत.