आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती: लोकवर्गणी करून जिंकली झेडपीची निवडणूक, उरलेल्या पैशाचा हिशेब देणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- निवडणूक म्हटली की, लाखो, काेट्यावधीपर्यंतही उमेदवाराला खर्च करावा लागतो. ग्रामपंचायत निवडणुकीपासून ते लोकसभा निवडणूकीपर्यंत विना पैश्याने निवडणूक लढवता येत नाही, असेच बहूतांश ठिकाणचे चित्र राहते. मात्र वरूड तालुक्यातील बेनोडा जिल्हा परिषद सर्कलचे नवनिर्वाचीत सदस्य देवेंद्र भुयार यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी गावकऱ्यांनी अक्षरश: गावोगावी झाेळी फिरवून लोकवर्गणीतून जवळपास लाख रुपये गोळा केले. निवडणूक खर्च वजा करता लाख हजार रुपये शिल्लकही राहिले आहेत. प्रत्येक व्यक्तीने दिलेल्या पै पै चा हिशेब मार्चला जनतेपुढे सादर करणार असल्याचे भुयार यांनी सांिगतले. 

वरूड तालुक्यातील बेनोडा जिल्हा परिषद सर्कलमधून शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे देवेंद्र भुयार यांनी निवडणूक लढवली विजयी झाले. अतिशय सर्वसामान्य तळागळातील कार्यकर्ता अशी २९ वर्षीय देवेंद्र भुयार यांची ओळख आहे. मात्र त्यांची आर्थिक स्थिती जेमतेम, निवडणूक लढवण्यासाठी लागणारा किमान खर्च करावा, अशीही त्यांची परिस्थिती नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी लोकवर्गणी करण्याचा निर्णय घेतला. बेनोडा जिल्हा परिषद सर्कलमधील २१ गावांमध्ये लोकवर्गणी करण्याचा निर्णय झाला.
 
इसमरी गावातून लोकवर्गणीसाठी कार्यकर्त्यांनी झोळी उचचली. पाहता पाहता या २१ गावांतून जवळपास लाख रुपये जमा झाले. त्यापैकी दीड लाख रुपये निवडणुकीसाठी खर्च झाला तर ४३ हजार रुपये इतर खर्च झाला. तरीही वर्गणीच्या लाखांपैकी लाख हजार रुपये शिल्लक राहिले आहे. मार्चला इसमरी या गावात खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत उरलेल्या रकमेचे काय करायचे, याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हा कार्यकर्ता मोठ्या मतांच्या फरकाने निवडून आला आहे. 

तडीपार केले होते, तेव्हापासून चर्चेत
चारते पाच महिन्यांपुर्वी देवेंद्र भुयार यांना तडीपार करण्याचा निर्णय उपविभागीय अधिकाऱ्यांनी घेतला होता. त्यामुळे भुयार काही दिवस तडीपार होते. मात्र नंतर हा आदेश विभागीय आयुक्तांनी रद्द् ठरवला. सर्वसामान्य कार्यकर्त्याला तडीपार केल्यामुळे त्यावेळी वरूडमध्ये अनेक ठिकाणी जनतेमध्ये नाराजीसुध्दा होती.
 
जनतेचे उपकार, पै पैचा देणार हिशेब 
कार्यकर्त्यांनी२१गावात झोळी फिरवली. या झोळीमध्ये लाख २३ हजार रुपये जमा झाले. तसेच ते गावात डबे ठेवले होते. या डब्यातही रोख जमा झाली. प्रत्येक व्यक्तीने दिलेल्या पै पैचा हिशेब आम्ही ठेवला असून मार्चला हा हिशेब जनतेपुढे सादर करणार आहे. कारण जनतेचे हे उपकार आहेत. ते कदापि विसरणार नाही. देवेंद्रभुयार, जि.प.सदस्य बेनोडा शहीद सर्कल. 
बातम्या आणखी आहेत...