आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्रांच्या आर्थिक मदतीतून लढला निवडणूक, थेट आमदारपुत्राला धोबीपछाड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गारज - निवडणूक म्हटले की सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेरचा विषय. उभे राहायचे म्हणजे सर्वच विचारतात, किती खर्च करणार, कसा करणार, यावरच निवडणुकीची गणिते मांडली जातात.
 
परंतु कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना व घरची परिस्थिती बिकट असतानाही परिस्थितीवर मात करत भाजपच्या एका सामान्य कार्यकर्त्याने वैजापूर तालुक्यातील जरूळ गणातून निवडणूक लढवत थेट आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या पुत्राचा पराभव करत २२७ मतांच्या फरकाने जिंकून सामान्य लोकदेखील निवडणूक लढू व लढून जिंकू शकतात, हे सिद्ध केले. त्याचे नाव सुरेश राऊत असे आहे. 
 
महाराष्ट्रासह जिल्ह्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत  लाखो रुपये खर्च करत  अनेक राजकीय नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावत निवडणूक लढवली, परंतु एकही रुपया खर्च न करता  निवडणूक लढवून ती कशी जिंकली जाते, याचे राऊत हे  एक अपवादात्मक उदाहरण आहे. वयाच्या चौथ्या वर्षी वडिलांचे छत्र हरपल्यानंतर वडिलोपार्जित छप्पन्न  गुंठे शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या सुरेश राऊत यांना लहानपणापासूनच समाजकार्याची ओढ असल्याने गरिबांची कामे करून देण्यात रस होता.
 
त्यामुळे गावातील असो किंवा परिसरातील कुणाचेही काम असो,  नेहमी करून देत. त्यामुळे त्यांचा लोकांशी मोठ्या प्रमाणात संपर्क वाढला होता. जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांच्यासोबत राहून त्यानी दांडगा लोकसंपर्क वाढवत याच्याच जोरावर भाजपकडून जरूळ गणात उमेदवारी मिळवली.

कसा चालतो उदरनिर्वाह
सुरेश राऊत यांचा उदरनिर्वाह ५६ गुंठे जमिनीतील उत्पादनासह गावात छोटे किराणा दुकान आहे त्यावर चालतो.  पत्नी मोलमजुरी करते.

मित्रपरिवाराचे सहकार्य : 
अर्ज भरण्यासाठी सुरेशला मित्रांनी आर्थिक मदत केली.  
 
दहावीपर्यंत शिक्षण : सुरेश राऊत यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले असून ते मुक्त विद्यापीठातून बी.कॉम.चे शिक्षण घेत आहेत.  
 
स्टिकर, बॅनरचा खर्च
निवडणुकीत आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने कुणाला चहादेखील पाजू न शकणाऱ्या सुरेशने केवळ मित्रांच्या मदतीने स्टिकर व बॅनरवर खर्च केला. याशिवाय कोणताही खर्च नाही.
बातम्या आणखी आहेत...