औरंगाबाद- विधानसभा निवडणुकीचा शेवटचा सुपर संडे सत्कारणी लावण्यासाठी शहरातील तीनही मतदारसंघांतील सर्व राजकीय पक्ष व अपक्षांची यंत्रणा सज्ज झाली आहे. रविवारी जास्तीत जास्त मतदारांना गाठण्यासाठी निघणाऱ्या पदयात्रा व रॅलींनी शहर दणाणून निघणार आहे. याशिवाय घरोघर मतदारांना साकडे घालण्यात येणार आहे.
निवडणुकीच्या प्रचारातील रविवार हे जास्तीत जास्त मतदारांना गाठण्यासाठी वापरले जातात. त्यात प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यातील रविवार हा सर्व शक्ती पणाला लावण्याचा असतो. उद्याचा (दि. १२) रविवार असाच असणार आहे. औरंगाबाद पूर्व, पश्चिम व मध्य हे शहरातील तीन ही मतदारसंघ उद्या सगळे उमेदवार पिंजून काढणार आहेत.
आता काम पक्ष यंत्रणेचे : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत युती आणि आघाडीचा विचका झाल्याने उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे 27 सप्टेंबरपर्यंत सगळेच पक्ष व उमेदवार गॅसवर होते. चित्र स्पष्ट झाल्यानंतर प्रचाराला एकदाची गती आली. उणेपुरे 15 दिवस हाती असल्याने उमेदवारांची प्रचंड धावपळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या धावपळीचे आता शेवटचे दोन दिवस उरले आहेत. त्यातला रविवार हा अतिशय धावपळीचा ठरणार आहे. उद्याचा प्रचार हा कार्यकर्ता व पक्षाच्या यंत्रणेची कसोटी असून त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जय्यत तयारी केली आहे. आज बहुतेक सर्व पक्षांनी बैठका घेत सुपर संडेचे प्लॅनिंग केले आहे.
निवडणुकीत युती आणि आघाडीचा विचका झाल्याने उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे 27 सप्टेंबरपर्यंत सगळेच पक्ष व उमेदवार गॅसवर होते. चित्र स्पष्ट झाल्यानंतर प्रचाराला एकदाची गती आली. उणेपुरे 15 दिवस हाती असल्याने उमेदवारांची प्रचंड धावपळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या धावपळीचे आता शेवटचे दोन दिवस उरले आहेत. त्यातला रविवार हा अतिशय धावपळीचा ठरणार आहे. उद्याचा प्रचार हा कार्यकर्ता व पक्षाच्या यंत्रणेची कसोटी असून त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जय्यत तयारी केली आहे. आज बहुतेक सर्व पक्षांनी बैठका घेत सुपर संडेचे प्लॅनिंग केले आहे.