आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Electric Light On Seven Hill Bridge In September

‘सेव्हन हिल’ पूल सप्टेंबरमध्ये उजळणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सेव्हन हिल उड्डाणपुलावरील अंधार दूर होण्यासाठी किमान 25 दिवस लागणार असून पुलावरील प्रकाशासाठी सप्टेंबर महिना उजाडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या 21 दिवसांपासून स्थायी समितीच्या बैठकीत यावर चर्चा होत असली तरी अजून या पुलावर दिवे बसू शकले नाहीत.
या पुलावर पायलट प्रोजेक्ट म्हणून तीन पोल बसवण्यात येणार असून त्याचा प्रकाश चांगला वाटला तर नंतर एकूण 66 पोल बसवले जाणार आहेत. मात्र पायलट प्रोजेक्टचे खांब चेन्नईहून अजून निघालेले नाहीत. आल्यानंतर ते बसवण्यासाठी काही दिवस जातील. त्यानंतर त्याच्या प्रकाशांचे मोजमाप केले जाईल. योग्य वाटले तर उर्वरित 63 खांबांसाठी आदेश दिले जातील. या प्रक्रियेला किमान 25 दिवस लागतील, असे कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांनी सांगितले. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात या पुलावरील अंधार कमी होण्याची शक्यता खूपच धूसर आहे.