आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Electrical Wire Issue At Aurangabad, Divya Marathi

लोंबकळणार्‍या तारांची भीती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सिडको महानगर-1 येथील कामगार नागरिकांचा जीव लोंबकळणार्‍या विद्युत तारांमुळे धोक्यात आला आहे. लोंबकळणार्‍या तारांबरोबरच उघड्या डीपींकडेही महावितरण प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, यासंदर्भात वारंवार तोंडी व लेखी तक्रार करूनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे.
सिडको प्रशासनाने अल्प उत्पन्न व मध्यम उत्पन्न असणार्‍या कामगारांकरिता घरे उपलब्ध करून दिली. गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरामध्ये नागरिक राहतात. आज जवळपास पाच हजार नागरिक या ठिकाणी वास्तव्यास आहेत. सन 1996-97 दरम्यान बांधण्यात आलेल्या घरांसोबतच या ठिकाणी भूमिगत लघुदाब विद्युत वाहिनी, मिनी फीडर, ट्रान्सफॉर्मर व घरांजवळून तार ओढण्यात आले. त्या वेळी सुरक्षित भासणारे विद्युत तार, ट्रान्सफॉर्मर व जुनाट झालेली विद्युत यंत्रणा आज नागरिकांना धोकादायक ठरत आहे. यासंदर्भात नागरिकांनी सिडको प्रशासनाला तसेच महावितरणला वेळोवेळी तोंडी तसेच लेखी निवेदनही दिले. त्यावर प्रशासनाकडून दखल घेण्याचे केवळ तोंडी आश्वासन देण्यात आले. मात्र, अद्याप प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात न आल्यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.