आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्युत तारांचा धोका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- वॉर्ड क्रमांक 59 अजबनगर, खोकडपुरा अंतर्गत येणार्‍या कामगार कॉलनीतील मनपाच्या शाळेजवळील झाडांच्या फांद्या विद्युत तारांमध्ये अडकल्या आहेत. झाडांच्या फांद्या आणि विद्युत तारांमध्ये वार्‍यामुळे तारांचे घर्षण होत आहे. घर्षण होऊन ठिणग्या खाली पडत आहे. परिसरात शाळा असल्याने लहान मुलांचा वावर येथे जास्त असतो. त्यांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे. यासंदर्भात वारंवार मनपा कर्मचार्‍यांना सांगूनही फांद्याची छाटणी केली जात नाही. परिसरात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. काही ठिकाणी नाल्या तुंबलेल्या आहेत तर काही ठिकाणी कचर्‍याचे ढीग साचले आहे. या समस्यांकडे मनपा प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. परंतु झाडांच्या फांद्यामुळे होणारी स्पार्किंग थांबवा, झाडांच्या फांद्याची छाटणी करावी, अशी मागणी अवंतिका बळक यांनी केली आहे.
कार्यवाही केली जाईल
झाडांच्या फांद्यामुळे विद्युत तारांची स्पार्किंग
शिवनेरी कॉलनीत उच्च दाबाच्या विद्युत तारा खाली झुकल्या आहेत. यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. छाया: दिव्य मराठी

झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी तत्काळ कार्यवाही केली जाईल. कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली जाईल. सुनीता सोनवणे, नगरसेविका
लवकरच दुरुस्ती करू
शिवनेरी कॉलनीत विद्युत खांब वाकला आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी अधिकार्‍यांना सांगून काम केले जाईल. समीर पाठक, जनसंपर्क अधिकारी, जीटीएल

दिव्य मराठी हेल्पलाइन
तुमच्या समस्या आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. त्यासाठी आमच्या प्रतिनिधींना 9765070333, 9028045199 या मोबाइल क्रमांकांवर समस्या कळवा.