आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका युनिटसाठी ४,७१० रुपये वीज बिल!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जीटीएलच्या गलथान कारभाराचा अनेक वीज ग्राहकांना धक्का बसत आहे. बायजीपुऱ्यातील बसैयेनगर येथील रहिवासी व सेवानिवृत्त अभियंता अनंत मोताळे यांना एक युनिट वीज वापरासाठी तब्बल ४,७१० रुपये वीज बिल देण्यात आले. हे वीज बिल पाहून त्यांना धक्काच बसला. या विरोधात त्यांनी जीटीएल व्यवस्थापनाकडे जाब विचारला असता नजरचुकीने वीज बिल आले असावे, अशी सारवासारव करून ते दुरुस्त करून देण्याचे आश्वासन दिले.

बसैये यांचे वीज मीटर काही कारण नसताना एप्रिल २०१४ मध्ये बदलण्यात आले. याबाबत त्यांना माहितीही देण्यात आली नाही. त्यानंतर तीन महनिे योग्य वीज बिल मिळाले, पण जुलै महनि्याचे चक्क ४७१० रुपये वीज बिल देण्यात आले. विशेष म्हणजे या बिलात वीज वापर केवळ एक युनिट दाखवण्यात आला. वीज बिल दुरुस्तीसाठी त्यांना जीटीएल कार्यालयात चकरा माराव्या लागल्या. तेथे कुणीही समाधानकारक उत्तर दिले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. जनसंपर्क अधिकारी समीर पाठक यांनी सुधारित वीज बिल देण्याचे आश्वासन दिले असले, तरी यावर आपण समाधानी नसल्याचे बसैये यांचे मत आहे. वीज ग्राहकांना चुकीचे वीज बिल मिळतेच कसे, वीज मीटर बदलण्याचे कारण नसताना नवीन मीटर का बसवले, आदी प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

सर्वेक्षण झाल्यानंतर कारण कळणार : जास्त बिलाची तक्रार पुणे येथील कार्यालयाकडे पाठवण्यात येते. या तक्रारीची चौकशी करण्यासाठी शहरात १२ ते १५ जणांची टीम काम करते. कारणे शोधण्यासाठी ही टीम सर्वेक्षण करून पुणे व जीटीएलला अहवाल देते. मोताळे यांच्या तक्रारीचा रिपोर्ट पुण्याला पाठवण्यात आला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर चुकीचे कारण कळेल. रीडिंग घेण्यासाठी २५० ते ३०० लोक कार्यरत आहेत. महावितरण कार्यालयात बिलाची छपाई होते, अशी माहिती जीटीएलचे जनसंपर्क अधिकारी समीर पाठक यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना दिली.
सर्व गोलमाल
वीज बिलाच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी पुणे येथील कार्यालयाची ग्राहकांना वाट पाहावी लागते. वीज बिल वेळेवर भरले नाही म्हणून १८ टक्के व्याज आकारण्यात येते. चूक त्यांनी करायची आणि खेटे वीज ग्राहकांना मारावे लागतात.
माझा ऑगस्ट २०१३ ते मे २०१४ पर्यंत कधीही १५० युनिटपेक्षा अधिक वीज वापर नाही, परंतु जुलै महनि्यात ७२१ युनिट वीज वापर केल्याचे दाखवून ७१०० रुपयेे वीज बिल दिले. जीटीएलचे जनसंपर्क अधिकारी समीर पाठक यांना माहिती दिली. त्यांनी दुरुस्ती करून वीज बिल देण्याचे आश्वासन दिले. ते न पाळता ऑगस्टमध्ये पुन्हा १२०० रुपये व ७२१ युनिटचे मिळून ८ हजार ३३७ रुपये बिल दिले. जीटीएल बिल कमी करून देण्यास टाळाटाळ करत आहे.
देविदास प्रधान, ग्राहक