आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज मंडळाला दिलेल्या जागांना मनपा व्यावसायिक दर लावणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - काल ४३ लाखांच्या बिलासाठी महावितरणने मनपाची वीज तोडल्यानंतर महापालिकाही आता अस्तन्या सरसावून सज्ज झाली आहे. मनपाच्या शाळांना, मनपाला व्यावसायिक दराने वीज देणाऱ्या महावितरणकडून मनपा डीपी, खांब, इमारतींसाठी व्यावसायिक दराने कर आकारणार आहे. याबाबतचा प्रस्ताव लवकरच सादर करण्यात येणार आहे. सिद्धार्थ उद्यान मनपाची प्रशासकीय इमारत यांचे एकूण ४३ लाख रुपयांचे वीज बिल थकल्याने काल महावितरणने महापालिकेच्या मुख्य इमारतीची सिद्धार्थ उद्यानाची वीज तोडली होती. १४ लाख रुपये मनपाने भरल्यानंतर उर्वरित २९ लाखांबाबत हमी घेतल्यानंतरच पुन्हा वीज जोडण्यात आली. मात्र, या प्रकारामुळे मनपाने महावितरणच्या बाबतीतही कडक धोरण अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था ही नफा कमावणारी संस्था नसतानाही महावितरण मनपाला आणि मनपाच्या शाळांनाही व्यावसायिक दराने वीजपुरवठा करते. त्यामुळे महावितरणचे खांब, डीपी, कार्यालये यांनाही व्यावसायिक दराने कर आकारण्याचा निर्णय जवळपास झाला आहे. या संदर्भातील प्रस्ताव येत्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाकडूनच आणला जाणार आहे.
कारवाई का नाही?
वीज तोडणाऱ्या महावितरणने रस्त्यांतील खांब हटवण्यासाठी मनपाकडून मागील दीड वर्षात जवळपास एक कोटी रुपयांहून अधिक शुल्क घेतले. पण ते खांब काही हटले नाहीत. परिणामी, अनेक रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम अर्धवटच राहिले आहे. असे असताना वीज तोडून मनपाची नाचक्की करणाऱ्या महावितरणवर कोटी घेऊन खांब हटवल्याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
बातम्या आणखी आहेत...