आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाने दडी मारताच वाढली विजेची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गत१५ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यातच सप्टेंबरमध्ये उकाडा असह्य झाल्यामुळे विजेची मागणी १२ हजार मेगावॅटवरून थेट १५ हजार मेगावॅटपर्यंत पोहोचली आहे. ऑक्टोबर महिन्यात पाऊस झाला नाही तर विजेची मागणी १८ ते १९ हजार मेगावॅटपर्यंत जाईल, असा अंदाज महावितरणच्या मुंबईतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

यंदा राज्यात जून जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे या काळात वीजपंपासह घरगुती ग्राहकांकडून विजेची मागणी खूप कमी झाली होती. संपूर्ण राज्यात मेअखेरीस १९ हजार मेगावॅट वीज लागत होती. पाऊस सुरू होताच जूनच्या पहिल्याच आठवड्यात तीन हजार मेगावॅट, तर जुलैमध्ये पाच हजार मेगावॅटने विजेची मागणी कमी झाली. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात, तर राज्यात फक्त १० हजार मेगावॅट विजेची मागणी होती. मात्र, १५ दिवसांपासून पावसाने दडी मारताच विजेची मागणी तीन ते साडेतीन हजार मेगावॅटने वाढली असून आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत.

१२ तासच वीजपुरवठा
शेतकऱ्यांना यापूर्वी दिवसा आठ तास, तर रात्रीपर्यंतचा वेळ धरून १० तास असे चक्राकार पद्धतीने वीज वितरण केले जात होते. मात्र, ऑगस्टपासून सरसकट १२ तास म्हणजे सकाळी सहा ते सायंकाळी सहापर्यंत वीज मिळत आहे.

शेतकरी कुटुंबांसाठी अटल सौरऊर्जा
राज्यातील ज्या भागात शेतकऱ्यांच्या अात्महत्या झालेल्या आहेत त्यांची यादी करून त्या कुटुंबीयांना राज्य केंद्र सरकारच्या माध्यमातून अटल सौरऊर्जा देण्यात येणार आहे. सुरुवातीला पथदर्शी प्रकल्प म्हणून १० हजार कनेक्शन देण्यात येतील. या योजनेत शेतकऱ्यांच्या विहिरींवर सौर पॅनल बसवण्यात येतील. या योजनेसाठी महावितरण ६० टक्के काही रक्कम केंद्र सरकार देणार आहे. शेतकरी कुटुंबाना २५ हजार रुपये खर्च येईल. एरवी हाच खर्च साडेतीन लाखांच्या घरात जात असे.

८०० शेतकऱ्यांचा ग्रुप
अटल सौरऊर्जेचा प्रकल्प यशस्वी झाला तर काही महिन्यांतच तो सर्व शेतकऱ्यांना लागू करण्याचा सरकारचा विचार असून एका फीडरवर ८०० शेतकरी या प्रकारे हा प्रकल्प राबवला जाईल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...