आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Electricity Drop Out From LBT, But Bill Charges Not Less

एलबीटीतून वीज वगळली, पण तूर्त बिलात कमी नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जीवनावश्यक वस्तूंसह वीज व लॉटरीला एलबीटीतून (स्थानिक संस्था कर) वगळण्यात आले आहे. यामुळे विजेवरील 2 टक्के एलबीटी कमी होणार असली तरी महावितरणने याबाबत अद्याप जीटीएलला कळवले नसल्याने सध्या तरी वीजबिलात घट होणार नाही. दरम्यान, एलबीटीमुक्त वस्तूंच्या यादीत सरकारने 59 वस्तू टाकल्याने आधीच खडखडाट असणार्‍या मनपाच्या तिजोरीला वर्षाकाठी 10 कोटींचा खड्डा पडणार आहे.
राज्य सरकारने 59 वस्तू वगळण्याचा निर्णय नुकताच घेतला व अंमलबजावणीही सुरू केली. जीवनावश्यक वस्तू, डाळी, धान्ये यासह इतर छोट्या-मोठय़ा वस्तूंचा त्यात समावेश आहे. दोन टक्के करामुळे मनपाचे उत्पन्न वाढवणार्‍या वीज आणि लॉटरीचाही त्यात समावेश आहे. इतर वस्तूंवर 0.25 टक्के कर आकारला जातो. या वस्तू वगळण्यात आल्याने मनपाला दरमहा सव्वा ते दीड कोटीचा फटका बसेल. मनपाचे एलबीटीचे उद्दिष्ट 200 कोटी रुपयांचे आहे. ही तूट भरून काढण्यासाठी मनपाला अनुदान द्यावे, अशी मागणी सभागृह नेते सुशील खेडकर यांनी केली आहे.
पत्रक मिळाले नाही : जीटीएल
शासनाचे परिपत्रक आम्हाला मिळालेले नाही. ते मिळाल्यावर अंमलबजावणी करण्यास आमची हरकत नाही. शिवाय महावितरणकडूनही आम्हाला तशा काही सूचना नाहीत, असे जीटीएलचे सहयोगी उपाध्यक्ष सुनील वाव्हळकर यांनी सांगितले. त्यामुळे एलबीटी रद्द झाल्याचा फायदा ग्राहकांना लगेच मिळणार नाही.