आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरणकडून ग्राहकसेवेचा भंग: पूर्व सूचना न देता 2 ते 8 तासांसाठी वीज पुरवठा खंडीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सिकडो, सातारा- देवळाई परिसर, छावणी, वाळूज, सिटी चौक, हर्सुल, चिकलठाणा आदी भागात शुक्रवारी दुपारी दोन ते चार तासांसाठी वीज पुरवठा खंडीत होता. ऐन दुपारच्या सत्रात वीज गुल झाल्याने लहान ते ज्येष्ठापर्यंत नागरिकांना उकाड्याचा असाह्य त्रास सहन करावा लागला. छोटे मोठे व्यवसाय बंद पडल्याने आर्थिक नुकसान त्यांना सोसावे लागले.

ग्राहक सेवेचा भंग करून ग्राहकांना माहिती न देता तास दोन तास ते आठ तासापर्यंत अघोषित भारनियम केले जात आहे. याचा घरगुती, व्यवसायिक, उद्योजक आदी ग्राहकांना मोठा फटका बसत असून महावितरणच्या मनमानी कारभारा विरोधात रोष वाढत चालला आहे.

दोन तासांपेक्षा अधिक वेळ जर वीज पुरवठा खंडीत करायचा असेल तर ग्राहकांना त्याची माहिती एक दिवस आधी मिळायला हवी. तांत्रिक अडचणीमुळे बिघाड यास अपवाद आहे. मात्र, कती वेळ वीज बंद ठेवावी, असे काही बंधने घालून दिली आहेत. त्या कालावधीत वीज सुरू होणे ग्राहकांचा हक्क आहे. याचा महावितरण प्रशासनाला विसर पडला असून दर शुक्रवारी मान्सून पूर्वी देखभाल दुरूस्तीच्या नावाखाली आठतासापर्यंत वीज पुरवठा खंडित करण्यात येते. याची कधी माहिती दिली जाते तर कधी नाही. तसेच उर्वरीत दिवशी ही कुठे ना कुठे तास ते दोन तास वीज पुरवठा खंडित ठेवला जात आहे. शहराच्या बहुतांश भागात हीच स्थिती आहे. शुक्रवारी अशाच प्रकारे ग्राहकांना कोणतीही माहिती न देता सिडको, चिकलठाणा, हडको, देवळाई चौक, छावणी, सिटी चौक, वाळुज एल आणि ई सेक्टर आदी भागातील वीज पुरवठा दोन ते चार तासांसाठी बंद ठेवण्यात आला होता.  त्यामुळे हॉस्पिटलस, छोटे मोठे व्यावसायिकांचा व्यवसाय बंद पडून मोठे नुकसान झाले. नागरिकांना चार तास उकाड्यात काढावी लागली. दुपारच्या शिफ्टमधील चाकारमान्यांच्या आरामावर विरजन पडले.

अधीक्षक अभियंता अनभिज्ञ
शहरात वीज पुरवठा कुठे कुठे बंद ठेवण्यात आला आहे, त्या मागचे कारण आहे, असा प्रश्न अधीक्षक अभियंता दिनेश अग्रवाल यांना विचारला असता, याबाबत मला काहीच माहिती नाही, मात्र, देखभाल दुरूस्तीसाठी काही भागात आज वीज बंद ठेवण्यात आली असेल असे उत्तर दिले. यावर वीज पुरवठा खंडित करण्यापूर्वी ग्राहकांना माहिती का दिली नाही, असा प्रती प्रश्न विचारला असता, ते निरूत्तर झाले.

पुढे काय ?  
कायमस्वरूपी उपाययोजना हव्यात
दरवर्षी मान्सून डोक्यावर आला की, महावितरणच्या वतीने देखभाल दुरूस्तीची कामे हाती घेऊन ऐन उन्हात वीज बंद ठेवत येते. त्याचा शहरातील तीन लाख वीज ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या पेक्षा भूमिगत वाहिन्या व एअर बंच केबल टाकून कायमस्वरूपी उपयायोजना करणे आवशयक आहे. तशी मागणी जोर धरू लागली आहे. तर यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून निधी देखील मिळाला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नसल्याने वीज सेवा अडचणीत आहे.

पूर्व सूचना देणे अपेक्षित
दोन तसांपेक्षा जास्त पूर्व नियोजित वीज पुरवठा बंद करायचा असेल तर एक दिवस आधी ग्राहकांना माहिती देणे अपेक्षित आहे. तो ग्राहकांचा हक्क आहे.
- हेमंत कापडिया, ग्राहक प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोग.
बातम्या आणखी आहेत...