आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Electricity News In Marathi, Surplus Bill Issue In Aurangabad

जनतेच्या पैशाला ‘अंदाजे’चा झटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहरातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते आणि दुभाजकांवर जवळपास पथदिव्यांचे 20 हजार विद्युत खांब आहेत. त्यावर 41 हजार 500 दिवे लावण्यात आले आहेत. या खांबांवरील दिव्यांनी वापरलेल्या विजेची युनिटप्रमाणे मोजणी करण्यासाठी पालिकेने प्रत्येकी 10 ते 50, 50 ते 100 आणि 100 ते 200 खांबांच्या अंतराने पॅनेल बॉक्सची उभारणी करून त्यात विद्युत मीटर बसवले आहेत. त्यामुळे वापर झालेल्या विजेचे युनिटप्रमाणे रीडिंग घेऊन देयके आकारणे अपेक्षित आहे. मात्र, यातील बहुतांश मीटर बंद असून काही जळाले आहेत. याचा फायदा मात्र जीटीएल कंपनीला होत आहे. मनमानी वीज बिले देऊन कंपनी फायदा करून घेत आहे.
नवीन मीटर बसवलेच नाही
सिडको एन-2 ठाकरेनगर प्रभागातील जयभवानीनगर बेकरी, बीएमटू, कासलीवाल सारा पार्क, महाजन कॉलनी, हरिओम अपार्टमेंट, दीपाली रेसिडेंसी, विनय कॉलनी, सारा गार्डन, प्रभाग ‘फ’ मधील गारखेडा, उल्कानगरी इत्यादी भागातील पथदिव्यांच्या खांबांवरील पॅनेल बॉक्समध्ये 33 नवीन मीटर बसवण्यासाठी 27 नोव्हेंबर 2011 रोजी कोटेशन मागवण्यात आले. यासाठी उपायुक्तांच्या नावाने दोन आणि तीन हजार रुपयांचे आयडीबीआय बँकेचे धनादेश देऊन जीटीएलकडून हे कोटेशन घेतले. त्यानंतर 15 डिसेंबर 2011 रोजी रीतसर पावत्याही पालिकेच्या विद्युत विभागाला मिळाल्या. मात्र, या कोटेशनच्या पावत्या सलग तीन वर्षांपासून अधिकार्‍याने दडवून ठेवल्या. यामुळे नवीन मीटर बसवले गेले नाहीत. याबाबत नगरसेविका सत्यभामा शिंदे यांनी शाखा अभियंता देशमुख यांना मीटरबाबत विचारणा केली असता हा प्रकार उघडकीस आला.
हा घ्या लेखाजोखा
  • पीर बाजार परिसरातील महावीरनगरात ही स्थिती. तेथील मीटरही जळून खराब झाले आहे.
  • महापौर कला ओझा यांच्या वॉर्डातील संदेशनगरात जळून संपूर्ण खाक झालेले मीटर.
  • उपमहापौर संजय जोशी यांच्या निवासस्थानालगत देवानगरीतील बंद मीटरचे हे छायाचित्र.
  • मनपा आयुक्त हर्षदीप कांबळे यांच्या जलर्शी निवासस्थानासमोर नो मीटर असलेले पॅनल बोर्ड
शहरातील पथदिव्यांच्या खांबावरील जवळपास 700 विद्युत मीटर गायब असल्याचे डीबी स्टारच्या तपासात उघड झाले आहे. यामुळे मनपाला अँव्हरेज रीडिंगनुसार दिलेल्या बिलापोटी कोट्यवधी लुटले जात आहेत. ज्या खांबांवर बंद पडलेले मीटर आहेत तेही दुरुस्त केले जात नाहीत. यातून जीटीएलच्या मनाप्रमाणे बिल आकारण्याची सूट मनपाने दिली आहे. त्यामुळे मिळून जनतेचा पैसा लुटण्याचे उद्योग सुरू आहेत.