आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टिप्परने विजेचे नऊ खांब लोळवले, ८३२ घरे अंधारात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वाळूच्या टिप्परने बुधवारी रात्री बीड बायपासवरील राजकमल हॉटेलच्या बाजूला असलेल्या एका विद्युत खांबाला धडक दिल्यानंतर एक- दोन नव्हे तर तब्बल नऊ खांब वाकले. यामुळे परिसरातील ८३२ घरांचा वीजपुरवठा खंडित झाला. मात्र, महावितरणकडून केवळ ४० घरांची वीज खंडित झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
गोदावरी ढाब्याजवळ मोकळ्या जागेत शुक्रवारी रात्री एकच्या दरम्यान वाळू उतरवण्याचे काम सुरू होते. या वेळी एमएच २० डीई ५०९० हा टिप्पर खांबावर धडकला. यातून सावरत असतानाच दुसऱ्या खांबालाही धडकला. त्यामुळे तारा ओढल्या जाऊन नऊ खांब वाकले. तसेच तार तुटल्याने वीज खंडित झाली. परिणामी संग्रामनगर, दिशानगरी, सूर्यदीपनगर, अप्रतिमपुष्प, विवेकानंद नगर, जयदीप नगरसह हॉटेल्स, पेट्रोल पंप आणि काही घरे अशा मिळून ८३२ इमारतींत अंधार पसरला. रात्री दोन वाजता नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोनवर घटनेची माहिती दिली. अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. टिप्परचालक शेख तय्यब शेख रहीम (रा. देवळाई) याला पोलिसांच्या स्वाधीन करून तक्रार दिली. कर्मचाऱ्यांनी सकाळी सातपासून दुरुस्तीचे काम हाती घेतले. सायंकाळपर्यंत ४०० घरांचा पुरवठा सुुरळीत केला. रात्री उशिरापर्यंत काम सुुरू होते.

सणासुदीचे दिवस असल्यामुळे महावितरणने सकाळी सात वाजेपासून १५ कामगार, लाइनमन, अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता असे मनुष्यबळ आणि जेसीबीच्या साहाय्याने कामाला प्रारंभ केला.

टिप्परचालक दारू पिऊन गाडी चालवत असल्याचा संशय काही नागरिकांनी व्यक्त केला. या घटनेत दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे पोलिस तक्रारीत म्हटले आहे. वाकलेल्या खांबांपैकी सहा कायमचे निकामी झाले आहेत. काही ठिकाणी ताराही बदलण्याची आवश्यकता आहे.

^निम्म्या संग्रामनगरसहआसपासची सर्व घरे आणि हॉटेलमध्ये रात्रीपासून वीज नाही. एका ड्रायव्हरच्या चुकीमुळे ९०० पेक्षा जास्त घरांमध्ये वीज नव्हती. काम सुरू केल्याने काही घरांत वीज आली. सुबोध शिंदे, नागरिक, संग्रामनगर

केवळ ४० घरांमध्ये वीज नव्हती. बायपासलगतची काही हॉटेल्सही अंधारात होती. दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. दुुरुस्तीचे काम सुरू आहे. विनय घनबहादूर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता

^पूर्वी वीजये-जा करत होती. मात्र रात्री वीज गेल्यानंतर ती आलीच नाही. आम्ही महावितरणला फोन केला. उकाड्यातच रात्र काढावी लागली. अजूनही वीज आली नाही. सुशील चोरडिया, नागरिक, दिशानगरी

^रात्री दोनपासूनवीज गेली होती. महावितरणच्या अधिकाऱ्यांना कॉल करून वीज गेल्याचे सांगितले. मात्र, खांबच वाकल्याने रात्र अंधारात काढावी लागली. दिलीपकाळे, नागरिक, आमदार रोड

बातम्या आणखी आहेत...