आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज वाहिन्यांना खेटल्या शहरातील 30 हजार इमारती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शहराच्या विविध भागांतील 30 हजारांपेक्षा अधिक इमारत मालकांनी अतिक्रमण करून बांधकाम केल्याने धोकादायक विद्युत वाहिन्यांचा स्पर्श होत असल्याचे जीटीएलने केलेल्या सर्वेक्षणात उघड झाले आहे. 225 इमारत मालकांना वाहिन्यांपासून सावध राहण्याच्या नोटिसा जीटीएलने बजावल्या आहेत.

शहरात 40 वर्षांपूर्वीच्या विद्युत खांब व वाहिन्या आहेत. प्रारंभी खांब इमारतींपासून ठरावीक अंतरावर होते. शहर झपाट्याने वाढल्यामुळे इमारतींच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली. रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले. परिणामी विशेष अंतरावर असलेले विद्युत खांब आणि वाहिन्या इमारतीला स्पर्श करू लागल्या. रस्त्यावरील खांब धोकादायक ठरू लागले. यासंदर्भात नागरिकांनी शंभरापेक्षा अधिक नागरिकांनी जीटीएलकडे लेखी तक्रारी केल्या. जीटीएलने तक्रारींची शहानिशा करण्यासाठी नुकताच सव्र्हे केला असता 225 पेक्षा अधिक नागरिकांनी इमारतीचे बांधकाम विद्युत खांब व वाहिन्यांपर्यंत केल्यामुळे अनेकांची घरे वाहिन्यांच्या अगदी जवळ असल्याचे निदर्शनास आले. या सर्व घरमालकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती जीटीएलचे जनसंपर्क अधिकारी समीर पाठक यांनी दिली.

सहा महिन्यांनंतरही मंत्र्यांचे आश्वासन हवेत
शहरातील सिडको मध्यवर्ती नाका ते रोशन गेटपर्यंत 33 केव्हीच्या विद्युत वाहिनीबाबत आमदार एम. एम. शेख यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. तेव्हा ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी हे काम नियोजन समितीच्या निधीतून करणार असल्याचे आश्वासन दिले होते. सहा महिने उलटले तरीही हे काम झालेले नाही.

वीज वाहिन्या भूमिगत करा
अयोध्यानगरातील संपूर्ण गल्ली विद्युत वाहिन्यांच्या विळख्यात आहे. गत चार वर्षांत वाहिनीला स्पर्श होऊन तिघांचा मृत्यू झाला, तर चौघांना अपंगत्व आले आहे. रायगड व प्रतापगडनगराप्रमाणे वाहिन्या भूमिगत केल्यास धोका टाळता येईल. पृथ्वीराज राठोड, नागरिक

भूमिगत वाहिन्यांचा प्रस्ताव
सिडको- हडको निर्मितीनंतर नवीन शहरात घरांची संख्या वाढली. नागरिकांनी विस्तारीकरणाच्या वेळी मोठय़ा वाहिन्यांजवळ बांधकाम केल्याने काही घटना घडलेल्या आहेत. या वाहिन्या भूमिगत कराव्यात म्हणून प्रस्ताव तयार करण्याचे आदेश संबंधित विभागास दिले आहेत. चंद्रकांत खैरे, खासदार

या भागांचे केले सर्वेक्षण
चाऊस कॉलनी, युनूस कॉलनी, राजाबाजार, जाधववाडी, शहागंज, रोशनगेट, सहयोगनगर, भक्तीनगर हसरूल, पिसादेवी परिसर, हिमायतबाग भागातील 225 इमारतींना 11 व 33 केव्ही विद्युत वाहिन्यांचा व खांबाचा स्पर्श होत आहे. अन्य काही भागांतील सर्वेक्षण सुरू आहे.