आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सिडको - सिडकोतील वृंदावननगर येथील रहिवाशांच्या उरात मुले खेळण्यासाठी घराबाहेर पडली की धडकी भरते. परिसरात मोठय़ा प्रमाणावर लोंबकळणार्या तारा असून यामुळे पाल्यांच्या काळजीने कायमच त्यांचा जीव टांगणीला लागलेला असतो.
परिसरातील या विद्युत तारांचा प्रश्न गंभीर बनला आहे. हाताला सहज लागतील इतक्या खालून या तारा लोंबकळत असतात.
तक्रारींकडे होतेय दुर्लक्ष - येथील उद्यानातील मुख्य प्रवेशद्वारावरून सहज या तारा हाताला लागू शकतात. याबाबत वारंवार विद्युत मंडळाकडेही तक्रार करण्यात आली मात्र याची दखल घेतली गेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अखेर नागरिकांनी नगरसेवक तानाजी जायभावे यांच्याकडे याबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर संबंधित अधिकार्यांना जाग आली आणि त्यांनी याबाबतचा पाठपुरावा सुरू केला आहे.
प्रश्न मार्गी - या बाबत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. कर्मचार्यांना या भागातील पहाणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या असून, दोन ते तीन दिवसांमध्ये हा प्रश्न मार्गी लागेल. एस. बी. गांगुर्डे, विद्युत अधिकारी
पाठपुरावा सुरू आहे - तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन विदय़ुत मंडळाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. अधिकार्यांनी दखल घ्यावी. प्रभागात 80 % तारा भूमिगत झाल्या आहेत. प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे काम अपूर्ण आहे. अँड. तानाजी जायभावे, नगरसेवक
बळी घेणार का? - यापूर्वी या तारांमुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत. मात्र लोंबकळणार्या या तारांचा प्रश्न मार्गी लावला जात नाही. आता कुणाचा बळी जाण्याची वाट पाहिली जातेय का? भागवत सोनवणे, नागरिक
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.