आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Electricity Price Hike Opposition Industrial Action Committee

वीजदरवाढीच्या विरोधात उद्योजक आंदोलन करणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- विजेचे दर कमी नाही केल्यास उद्योग बंद ठेवण्याचा इशारा उद्योग संघटनांनी दिला आहे. वाढत्या दरामुळे जालना येथील स्टील उत्पादनात तीस टक्के घट झाली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे, अशी माहिती सीएमआयएचे अध्यक्ष मुनीष शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वीज दरवाढीच्या विरोधात उद्योजक गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मात्र त्याबाबत राज्य सरकारकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे वीज दरवाढ विरोधी औद्योगिक कृती समितीच्या माध्यमातून आगामी काळात आंदोलन करण्याची तयारी उद्योजकांनी केली आहे.
वीज दर महागडे
ऊर्जामंचचे हेमंत कपाडिया यांनी विजेचे दर सादर केले. राज्यात प्रतियुनिट विजेचा दर ९ रुपये इतका आहे, तर इतर राज्यांत तो सहा रुपये प्रतियुनिट इतका आहे. नवीन राज्य सरकारने डिसेंबर २०१४ पासून महावितरणला देण्यात येणारे अनुदान बंद केले आहे. त्यामुळे ग्राहकांवर २० टक्क्यांपेक्षा आधिक दरवाढीचा बोजा पडला आहे.
स्टील उत्पादनात घट
स्टील क्षेत्रातील उद्योजक नितीन काबरा यांनी सांगितले, जालनामध्ये १४ स्टीलचे मोठे प्लँट आहेत. त्यापैकी दोन बंद झाले आहेत, तर उर्वरित १२ कंपन्यांमध्येही उत्पादनात ३० टक्क्यांची घट झाली आहे. या उद्योगाच्या माध्यमातून २० हजार लोकांना रोजगार मिळतो.