आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज 15 टक्क्यांनी महागण्याची शक्यता; महाजनको, महापारेषणचा प्रस्ताव मंजूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - महाजनको व महापारेषण कंपन्यांनी सरकारकडे दाखल केलेला दरवाढीचा प्रस्ताव राज्य वीज नियामक या सरकारी आयोगाने मान्य केला आहे. या वाढीची झळ ग्राहकांना बसणार आहे. आयोगाने महावितरण कंपनीने 2037.78 कोटी रुपये महाजनको व महापारेषण कंपनीला द्यावेत, असे आदेश आयोगाने दिले आहेत. त्यामुळे ग्राहकांना वीजदरात अंदाजे 15 टक्के वाढ अपेक्षित असल्याची माहिती आयोगाचे प्रतिनिधी हेमंत कापडिया यांनी दिली. दरवाढ पाच सप्टेंबरपासून होण्याची शक्यता आहे.

महाजनकोच्या खापरखेडा येथील संच क्रमांक 5, भुसावळ येथील संच क्रमांक 4 यांच्या उभारणीचा खर्च 932.01 कोटी, महाजनकोचा 2010-11 मधील मंजुरीतील फरक 143.12 कोटी तसेच महापारेषण कंपनीचा वीज वहन दर 962.65 कोटी असे एकूण 2037.78 कोटी महावितरण कंपनीस देणे आहे. ही रक्कम ग्राहकांकडून सहा महिन्यांत वसूल करण्यात येणार आहे. आयोगाच्या आदेशामुळे अंदाजे 13-15 टक्के दरवाढीची शक्यता आहे. या दरवाढीमुळे उद्योजक, व्यावसायिक व ग्राहकांना फटका बसेल, असे कापडिया म्हणाले.