आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजेचा धक्का; मुलगा गंभीर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मुकुंदवाडी लायन्स क्लब कॉलनीत विद्युत प्रवाह उतरलेल्या खांबाला स्पर्श झाल्याने संदीप कांतीलाल जाधव (12) गंभीर जखमी झाला. त्याच्यावर धूत रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती दिल्यानंतरही जीटीएलचे कर्मचारी न आल्याने संतप्त नागरिकांनी चिकलठाण्यातील कार्यालयात जाऊन तोडफोड करत दिसेल त्या कर्मचार्‍याला मारहाण केली.

लायन्स कॉलनीत पाच दिवसांपासून एअर बंच विद्युत वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. शनिवारी दुपारी 1 वाजता संदीप जाधव घराजवळ उभा होता. खांबाला स्पर्श होताच त्याला विजेचा धक्का लागला. दक्ष नागरिकांनी त्याला बाजूला काढले. सध्या संदीपवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 7 फेब्रुवारीलाही कामगारांच्या दिरंगाईमुळे ज्येष्ठ महिला रुक्मिणी जाधव यांच्या डोक्यात दगड पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. जीटीएलचे देखभाल-दुरुस्ती विभागाचे प्रमुख सय्यद शहा यांनी खांबात वीजप्रवाह नव्हता, असे म्हटले. संदीपच्या उपचारांचा सर्व खर्च जीटीएल देईल, त्याला शॉक कसा लागला याचा तपास करू, असे जीटीएलचे वरिष्ठ अधिकारी प्रकाश चंदन यांनी सांगितले.

जीटीएल कार्यालयात धक्काबुक्की
जीटीएलच्या अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्यामुळे रमेश खंडागळे, मनविसे जिल्हाध्यक्ष हनुमान शिंदे, शौकत पटेल, गणेश निकाळजे, रामेश्वर निकाळजे, विजू बनकर, किरण जाधव, संगीता शिंदे यांच्यासह शेकडो संतप्त नागरिकांनी जीटीएलच्या मुख्य कार्यालयात जाऊन कर्मचार्‍याला चांगलाच चोप दिला.