आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Electricity Shortage Issue At Aurangabad, Divya Marathi

भारनियमनाचे संकट: वीजगळती,थकबाकी असणा-या हर्सूल, चिकलठाणा,शहागंजला फटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरात ज्या भागात वीजगळती व थकबाकी अधिक आहे, अशा ठिकाणी भारनियमन केले जाणार आहे. यासाठी जीटीएल व्यवस्थापनाने महावितरणला परवानगी मागितली असून सर्वेक्षणानंतर भारनियमनाच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
जीटीएलच्या सर्वेक्षणानुसार शहागंज, चिकलठाणा, हसरूल परिसर, छावणी, पडेगाव आणि बीड बायपास आदी ठिकाणी 50 टक्क्यांपेक्षा अधिक वीज बिलाची थकबाकी असून 18 टक्क्यांपेक्षा अधिक वीजगळती होते. शहरात वीजचोरी, वीजगळती रोखण्यास जीटीएलला अपयश येत आहे. तसेच थकबाकीची प्रभावी वसुली न झाल्याने ही तूट भरून काढण्यासाठी या परिसरात भारनियमन करण्यासाठी जीटीएलने महावितरणकडे पत्रव्यवहार केला होता. त्यात 12 मेपासून भारनियमन करण्याची परवानगी मागितली आहे. जे वीजग्राहक नियमित वीज बिलाचा भरणा करतात, त्यांना या निर्णयामुळे नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. दरम्यान, अद्यापपर्यंत तरी जीटीएलला भारनियमनासंदर्भात परवानगी देण्यात आली नसून याबाबत नंतर माहिती देण्याचे महावितरणचे मुख्य अभियंता शंकर शिंदे यांनी सांगितले.
50 टक्क्यांपेक्षा अधिक
जीटीएलच्या सर्वेक्षणानुसार शहागंज, चिकलठाणा, हसरूल परिसर, छावणी, पडेगाव आणि बीड बायपास आदी ठिकाणी वीज बिलाची थकबाकी.
बायजीपुरा, सिडकोत आज भारनियम
जीटीएलने शुक्रवारी सिडको एन-1, जाधववाडी, रामनगर फीडर, एन-3, गारखेडा परिसरात सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत चार तास वीजपुरवठा खंडित केला होता. शहरातील तापमानाने चाळिशी पार केल्याने नागरिकांना उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. शनिवारी 33 केव्ही वाहिनी, 132 केव्ही वाहिनीच्या देखभाल-दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. दुपारी 2 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सिडको उपकेंद्र व हसरूल उपकेंद्र पूर्णत: बंद राहणार आहे. त्यामुळे रोशन गेट, शहागंज, बायजीपुरा, किराडपुरा, सिडको एन-3, एन-4 आदी भागांत भारनियमन होईल.
सर्वेक्षणानंतर पुढील कार्यवाही
थकबाकी आणि गळतीचे प्रमाण जाणण्यासाठी सर्वेक्षण केले जात आहे. त्यानंतर भारनियमन केले जाईल. यासाठी महावितरणची परवानगी घेतली आहे. प्रकाशचंदन, विभागप्रमुख, देखभाल-दुरुस्ती विभाग, जीटीएल.