आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खंडित विजेमुळे नळांना कोरड; पाण्यासाठी दैना; महावितरणच्या कारभाराचा ग्रामस्थांना जबर फटका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - गेल्या पंधरवड्यापासून वारंवार खंडित होणार्‍या वीजपुरवठ्यामुळे वाळूज येथील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. दोन दिवसांपासून पाणीपुरवठाही बंद असल्याने नळांना कोरड पडली आहे. पावसाने दडी मारल्याने अजूनही तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. त्यातच महावितरणच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे.

महावितरणच्या वाळूज युनिटमध्ये 14 गावे आहेत. या युनिटचा कारभार एक कनिष्ठ अभियंता, 1९ लाइनमन आणि तीन वीजसेवकांकडे आहे. या युनिटमध्ये घरगुती ग्राहकांची संख्या 10 हजार 200, कमर्शियल 750 व कृषी विभागाचे 1 हजार 592 ग्राहक आहेत. एकट्या रांजणगाव शेणपुंजी गावातील वसुली 5८ लाखांवर, तर वाळूजची वसुली 3९ लाखांवर आहे. युनिटअंतर्गत येणार्‍या इतर गावांतील वसुलीही तालुक्यातील वसुलीच्या तुलनेत बर्‍यापैकी आहे. तरीही इतर गावांसारखी वाळूज परिसराला महावितरणकडून सेवा पुरवली जात नाही. या भागात सध्या दररोज साडेनऊ तासांचे वीज भारनियमन केले जाते. दिवसा 7 तास व रात्री 7 ते ९:30 दरम्यान असे मिळून एकूण साडेनऊ ते दहा तासांचे दररोज वीज भारनियमन करण्यात येते. त्यातच मागील पंधरवड्यापासून वारंवार वीज खंडित होत आहे. त्यामुळे विजेशी संबंधित व्यावसायिकांच्या व्यवसायांचे तीनतेरा वाजले आहेत. अगदी दहा-दहा मिनिटांना वीजपुरवठा खंडित होत असल्याने विद्युत उपकरणे चालवणे अवघड झाले आहे.
अनेकदा सांगूनही दुर्लक्ष
नगर-औरंगाबाद महामार्गावर माझी पिठाची गिरणी आहे. वारंवार वीज खंडित होत असल्याने व्यवसाय अडचणीत आला आहे. ट्रान्सफॉर्मरवरील फ्यूज उडाल्याची माहिती देऊनही महावितरणचे कर्मचारी दुर्लक्ष करतात. इलाजाने अनेक वेळा आम्हीच फ्यूज टाकतो. त्यातून दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?
शेख इब्राहिम सांडू पटेल, पीठगिरणी मालक
रात्रीची झोप उडाली
४ग्रामपंचायतीच्या वतीने गावाला अगोदरच आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा केला जातो. त्यातच विजेच्या लपंडावामुळे पाणीपुरवठा दहा दिवसांवर गेला आहे. आता तर वीजपुरवठाच बंद पडल्याने पिण्याच्या पाण्याचे कसे होणार, या प्रश्नामुळे रात्रीची झोप उडाली आहे.
चंद्रकलाबाई मंगेश पवार,
कामगार महिला, लायननगर. वाळूज
विजेअभावी पाणीपुरवठा बंद
४मागील पंधरवड्यापासून वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार सुरू आहे. आता तर मंगळवार सकाळपासूनच वीजपुरवठा बंद आहे. वीज नसल्याने विहिरीवरील पंप कसे सुरू होणार. गावाला पाणीपुरवठा कसा करायचा?
एन. के. वाघमारे, ग्रामसेवक, वाळूज.

वादळी वार्‍याचा परिणाम

४ वादळी वार्‍यामुळे हा प्रकार घडत आहे. तांत्रिक बिघाडामुळे खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे.
एस. एस. लालसरे, क निष्ठ अभियंता, महावितरण.
पाणीपुरवठा कोलमडला
ग्रामपंचायतीतर्फे तीन पाणीपुरवठा विहिरींद्वारे गावाला पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार सुरू आहेत. याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला असून पाणीपुरवठ्याचे वेळापत्रकच कोलमडले आहे. मंगळवारपासून बुधवारी दुपारपर्यंत वीजपुरवठा बंद होता. त्यामुळे गावाचा पाणीपुरवठाही बंद आहे. अजून पावसाला सुरुवात नसल्याने ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.