आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत विद्युत प्रणाली अभ्यास केंद्र

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री अजित पवार यांनी 2012च्या अखेरपर्यंत राज्य भारनियमनमुक्त करण्याचा घेतलेला ध्यास पाहता वीज तुटवड्याचे संकट दूर करण्यासाठी औरंगाबाद येथे विद्युत प्रणाली अभ्यास केंद्रासह 765 केव्ही स्तराचे उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. तसा प्रस्तावही तयार करण्यात आहे.
विजेची मागणी आणि पुरवठा ही तफावत दूर करण्यासाठी विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. सध्या महापारेषणतर्फे 2500 मेगावॅट वीजनिर्मिती होत असून डिसेंबर 2014 पर्यंत आणखी 3230 मेगावॅट वीज निर्माण होणार आहे. त्याशिवाय मार्च 2017 ते नोव्हेंबर 2018 पर्यंत कार्यान्वित होतील अशा सात प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पांमधून आणखी 9570 मेगावॅट वीजनिर्मिती होईल.
31 मार्च 2012 पर्यंत महानिर्मितीने 10490 मेगावॅट तर खासगी कंपन्यांनी 470 मेगावॅट वीजनिर्मिती केली. तरीही 2011-12 मध्ये 1488 मेगावॅट विजेची तफावत आहे. 2009-10 मध्ये ही तफावत 2244 मेगावॅट होती. 2012-13 मध्ये महानिर्मिती, केंद्रीय आणि खासगी कंपन्यांमार्फत 6171 मेगावॅट वीजनिर्मितीची वाढ अपेक्षित आहे. विशेष म्हणजे 2014-15 मध्ये खासगी कंपन्यांद्वारे शून्य वाढ अपेक्षित आहे. स्मार्ट वितरण होण्यासाठी कंपनीने पावले उचलली असून रेडिओ फ्रिक्वेन्सी, इन्फ्रारेड मीटरचे काम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
काय आहे अभ्यास केंद्र?
* वीजनिर्मितीमध्ये कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावे म्हणून राज्यात 7 ठिकाणी प्रशिक्षण केंद्रे उभारणार. औरंगाबाद येथे विद्युत प्रणाली अभ्यास केंद्र उभारण्यात येईल.
* या केंद्रात निर्मितीपासून वितरणापर्यंतचे सर्व प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येईल.
* 2801 किमी लांबीचे ऑप्टिकल फायबर केबलने संपर्क यंत्रणा प्रभावी करण्यावर भर. यासाठी दोन कंपन्यांशी करार.