आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छावणीत आज चार तास वीज बंद; वाकलेले खांब काढून नवे खांब उभारणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- टेम्पोच्या धडकेने वाकलेले दोन खांब बदलण्यासाठी छावणी परिसरातील वीजपुरवठा सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत (चार तास) बंद ठेवला जाणार आहे. 30 जून रोजी सकाळी भरधाव टेम्पोने नगरनाक्याजवळील दोन खांबांना धडक दिल्याने हे 33 केव्ही वाहिन्यांचे दोन्ही खांब वाकले आहेत. खांबावरील वीज वाहिन्या चिकटल्यामुळे छावणी परिसरातील वीजपुरवठा दोन तास बंद झाला होता. त्या वेळी पर्यायी वीज व्यवस्था करण्यात आली होती. मात्र अखंडित वीज सेवा देण्यासाठी वाकलेले खांब काढून नवीन खांब उभारण्याचे काम शुक्रवारी केले जाईल.

या भागात बंद राहणार वीजपुरवठा
दुरुस्तीच्या कामासाठी होलिक्रॉस फीडर, छावणी फीडर, एम.ई.एस.फीडर, मिलिंद फीडरवरील वीजपुरवठा बंद राहणार आहे. या फीडरवर छावणी परिसर, मिलिंद महाविद्यालय परिसर, बन्सीलालनगर, महापौर बंगला, बाबा पेट्रोलपंप, रत्नप्रभा मोटर्स, पद्मपुरा परिसरातील वीजपुरवठा बंद राहणार आहे. टेम्पोचालक मच्छिंद्र विठ्ठल केळकर विरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात जीटीएलच्या वतीने तक्रार नोंदवण्यात आल्याचे जीटीएलचे जनसंपर्क अधिकारी समीर पाठक यांनी सांगितले.