आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Electronics Market Turnover Of 50 Crore Estimation

आज होणार ५० कोटींचे सीमोल्लंघन, इलेक्ट्रॉनिक्सच्या बाजारात उत्साह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पाडवा,दिवाळी, अक्षय्य तृतीया अन् दसरा असे साडेतीन मुहूर्त कुठल्याही खरेदीसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. आज दसऱ्याला सोन्याची खरेदी विशेष लक्षणीय उलाढाल करणारी ठरेल. दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची आधीच बुकिंग झाली असून संपूर्ण बाजारात ५० कोटींच्या उलाढालीचा अंदाज उद्योजक मनीष धूत यांनी वर्तवला आहे.
दुष्काळामुळे एकीकडे बाजारात मंदीची चर्चा होत असली तरी दुसरीकडे दसऱ्याचा मुहूर्त लक्षात घेऊन अनेकांनी भविष्याची सोयही करण्यावर भर दिला आहे. नुकताच क्रेडाईच्या वतीने झालेल्या गृहप्रदर्शनात ८०० घरांची बुकिंग झाली. यापैकी २०० घरांचा ताबा मिळणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर ५०० चारचाकी आणि हजार दुचाकींची विक्री झाली आहे. यापैकी बऱ्याच गाड्यांची बुकिंग १५ दिवस अगोदरपासून करून ठेवण्यात आली आहे. दुष्काळाचा कुठलाही परिणाम वाहन खरेदीवर जाणवत नाही, असे धूत म्हणाले. सणोत्सवानिमित्त नवे कलेक्शन लाँच केले जाते. यानुसार सिल्व्हरमध्ये नऊ रंगांचे कलेक्शन आम्ही यंदा दिले आहे. सोने घेणे सर्वांना शक्य होत नाही. पण चांदीही आकर्षकता देते. यामध्ये पासून २१ हजारांपर्यंत दागिने उपलब्ध आहेत. आजच्या मॉडर्न आणि आधुनिक युगात टेंपल ज्वेलरीला विशेष पसंती आहे. यंदा फक्त दसऱ्यालाच खरेदीऐवजी संपूर्ण नवरात्रात खरेदी करण्यात आली. शिवाय दसऱ्यासाठी बुकिंगही झाली आहे. नऊ दिवसांत कोटींची उलाढाल झाली आहे. संपूर्ण शहरात २२ ते २५ कोटींपर्यंतचे व्यवहार होण्याची शक्यता माधुरी लेले-घाटगे यांनी वर्तवली.
विजयादशमीच्या पूर्वसंध्येला इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दालनात गर्दी होत होती. छाया : अरुण तळेकर