आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घृष्णेश्वराचे दर्शन गाभा-याबाहेरूनच, ग्रामसभेत ठराव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळ - घृष्णेश्वराचे दर्शन गाभा-याबाहेरूनच घेण्याचा ठराव स्वातंत्र्यदिनी झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला. ग्रामस्थांची एकमुखी मागणी आणि देवस्थान समितीकडे आलेल्या लेखी अभिप्रायावरून हा निर्णय घेण्यात आला आहे. गाभा-यात दर्शनासाठी पुरुषांनी अर्धवस्त्र होण्याची पूर्वापार परंपरा येथे होती.

अर्धवस्त्र दर्शनावरून पर्यटक आणि भाविकांमध्ये नेहमीच वादाचे प्रसंग उद्भवत होते. त्यावरून अ.भा. आखाडा परिषदेचे राष्‍ट्रीय प्रवक्ते बाबा हटयोगी यांनी या मुद्द्यावर नाशिकच्या कुंभमेळ्यात चर्चा घडवणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर याविषयी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय वैद्य, कार्यकारी विश्वस्त योगेश टोपरे यांनी दै. ‘दिव्य मराठी’च्या माध्यमातून अभिप्राय मागवले होते.