आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगप्रसिद्द वेरुळ लेणीतील बौद्ध मूर्तीवरील किरणोत्सवास प्रारंभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरुळ- स्थापत्य कलेचा अद्धभुत नमूना असलेल्या जगप्रसिद्द वेरुळ लेनित एकूण 34 लेण्या असून यामध्ये बारा बौद्ध लेण्या आहेत. यातील दहा नंबरची बौद्ध लेणी ही चैत्य तर बाकीच्या बौद्ध लेण्या ह्या विहार असून यातील दहा नंबरच्या बौद्ध लेणीमधील मूर्तिवर सूर्य उत्तरायानला जात असताना सूर्यकिरणें येत असतात. 

हेच सूर्यकिरणें मूर्तिच्या चेहऱ्यावर येण्यास बुधवार पासून सुरुवात झाली असून येत्या आठ दिवस हा सोहळा भाविकांसह पर्यटकांना अनुभवता येईल अशाच प्रकारची सूर्यकिरणें हे मागच्या वर्षी 10 मार्च रोजी आली होती तर महाराष्ट्रातील बौद्ध लेण्यामधील हा शेवटचा चैत्य असून महायानास समर्पित आहे तर यामध्ये वज्रयाणाची काही शिल्पे बघायला मिळतात यालाच सुतार की झोपडी किंवा विश्वकर्मा मंदिर म्हणतात तर गुजरात मधील विश्वकर्मा लोक बुद्धालाच विश्वकर्मा समजून नमन करतात याचा उल्लेख त्यांच्या धार्मिक ग्रंथात आहे तर गुहेत प्रवेश केल्याबरोबर समोरच भगवान बुद्ध बौधी (पिंपळाचे) वृक्षाखाली बसलेले दिसत असून धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेत बघायला मिळतात भगवान बुद्धाच्या उजव्या हाताला बोधिसत्व पद्मपानी व डाव्या हातास बोधिसत्व वज्रपानी पहावयास मिळतात व मागच्या बाजूस स्तूप आहे तर छतास गज पुष्टाकृती आकार दिलेला दिसून येतो तर समोरच वाद्य मंडप दिलेला असून पूर्वीच्या काळी या ठिकाणी नगाडे वाजवून सकाळी व संध्याकाळी आरतीस बोलावले जात असे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, वेरुळ लेणीतील बौद्ध मूर्तीवरील किरणोत्सवासाचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...