आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेरूळ लेणीचे प्रवेश पास आता ऑनलाइन; आठ तज्ज्ञ होणार रुजू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळ- वेरूळ लेणीच्या प्रवेशद्वारासह पर्यटकांना घरबसल्या तिकीट उपलब्ध व्हावे या हेतूने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागातर्फे आता ऑनलाइन तिकिटाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विभागाच्या अधिकृत पर्यटन वेबसाइटवरून ऑनलाइन तिकीट खरेदी करता येणार असून याचा शुभारंभ संवर्धन सहायक हेमंत हुकरे, सतीश साळुंखे , जगन्नाथ काळे यांच्या उपस्थितीत गुरुवारी करण्यात आला.

ऑनलाइनद्वारे घेतलेले तिकीट लेणीत प्रवेश करतेवेळी दाखवणे बंधनकारक आहे. या तिकिटास प्रवेशद्वारावर मशीनद्वारे स्कॅन करण्यात येते. बारकोड सिस्टिम असल्याने तसेच एकवेळ स्कॅन केलेले तिकीट पुन्हा स्कॅन होत नसल्याने याचा दुबार वापर होणे अशक्य आहे. सार्क, बिमस्टेक भारतीय पर्यटकांना तिकीट दर ३० रुपये, तर इतर देशांतील पर्यटकांना ५०० रुपये तिकीट दर आहे.

आठ तज्ज्ञ होणार रुजू
लवकरचही ऑनलाइन यंत्रणा हाताळण्याकरिता गुजरात येथून आठ शिक्षित कर्मचारी वेरूळ लेणी येथे रुजू होणार आहेत. अचानकपणे ऑनलाइन सिस्टिम नादुरुस्त झाल्यास ऑफलाइनही तिकीट पर्यटकांना उपलब्ध होईल, तर सिस्टिम चालू होताच संपूर्ण डाटा ऑटोमॅटिक अपडेट होईल.
बातम्या आणखी आहेत...